T20 World Cup: संजू सॅमसन की रिषभ पंत? यष्टीरक्षक म्हणून कोणाला संधी मिळायला हवी? गौतम गंभीरने सुचवलं नाव
Rishabh pant or sanju samson former cricketer gautam gambhir picks his first choice wicket keeper for t20 world cup 2024 amd2000twitter

T20 World Cup: संजू सॅमसन की रिषभ पंत? यष्टीरक्षक म्हणून कोणाला संधी मिळायला हवी? गौतम गंभीरने सुचवलं नाव

Guatam Gambhir On Team India: येत्या काही दिवसात टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत यष्टीरक्षक म्हणून कोणाला संधी मिळावी याबाबत गौतम गंभीरने भाष्य केलं आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यासह ४ राखीव खेळाडूंची नाव जाहीर केली आहेत. मात्र अजूनही भारताची प्लेइंग ११ कशी असेल हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

आधी सलामीला कोण जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता रोहित आणि यशस्वी जयस्वाल सलामीला जाणार हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. मात्र यष्टीरक्षण कोण करणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. नुकताच भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि कोलकाता नाईट रायडरर्स संघाचा मेंटॉर गौतम गंभीरने यष्टीरक्षक कोण असावा याबाबत भाष्य केलं आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी संजू सॅमसन आणि रिषभ पंतची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. कार अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर रिषभ पंतला दिड वर्ष संघाबाहेर राहावं लागलं होतं. त्यानंतर त्याने आयपीएल २०२४ स्पर्धेतून दमदार कमबॅक केलं. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व करताना संजू सॅमसनने शानदार कामगिरी केली आहे. दोघांची कामगिरी पाहता नक्की कोणाला खेळवायचं या प्रश्नाने नक्कीच निवडकर्त्यांचं टेन्शन वाढलंय. दरम्यान गौतम गंभीरच्या मते रिषभ पंतला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं पाहिजे

T20 World Cup: संजू सॅमसन की रिषभ पंत? यष्टीरक्षक म्हणून कोणाला संधी मिळायला हवी? गौतम गंभीरने सुचवलं नाव
IPL Playoffs Scenario: दिल्लीच्या विजयाचा RCB ला फायदा! प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; या संघाचं टेन्शन वाढलं

गौतम गंभीरने एका मुलाखतीत बोलताना म्हटले की, ' रिषभ पंत आणि संजू सॅमसन दोघांमध्ये क्लॉलिटी आहे. जर मला दोघांमधून एकाची निवड करायला सांगाल, तर मी रिषभ पंतची निवड करेल. कारण तो मध्यक्रमात फलंदाजी करु शकतो. जर संजू सॅमसनला पाहाल, तर त्याने आयपीएल स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे.

माझ्या मते, रिषभ पंतने पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. सध्या भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून मधल्या क्रमात खेळणाऱ्या फलंदाजाची गरज आहे. त्यामुळे माझ्या मते रिषभ पंतला संधी मिळायला हवी. कारण तो संघात आल्याने मध्यक्रमात लेफ्टी- रायटी कॉम्बिनेश मिळेल.'

T20 World Cup: संजू सॅमसन की रिषभ पंत? यष्टीरक्षक म्हणून कोणाला संधी मिळायला हवी? गौतम गंभीरने सुचवलं नाव
DC vs LSG, IPL 2024: लखनऊसाठी 'करो या मरो'ची लढत; दिल्लीविरुद्ध कसा राहिलाय रेकॉर्ड?

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com