Rishabh Pant: मुंबईच्या कोकीलाबेन रुग्णालयात रिषभवर तीन तास ऑपरेशन, कधी होणार ठणठणीत बरा? पाहा हेल्थ अपडेट

शुक्रवारी रिषभ पंतचे एक ऑपरेशन पुर्ण झाले आहे. या ऑपरेशननंतर रिषभने चांगला प्रतिसादही दिला असून त्याच्या तब्बेतीत सुधारणा होत आहे.
Rishabh Pant Car Accident
Rishabh Pant Car Accident Saam Tv
Published On

Rishabh Pant: काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतचा दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ पंतच्या डोक्याला, पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. नुकतेच त्याला दिल्लीवरुन उपचारासाठी मुंबईला आणण्यात आले होते. सध्या त्याच्यावर मुंबईच्या कोकीलाबेन रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या शस्त्रक्रियेबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. (Rishabh Pant Car Accident)

Rishabh Pant Car Accident
Ravindra Jadeja Fitness Update : रविंद्र जडेजाच्या फिटनेसवर मोठी अपडेट, कधी करणार पुनरागमन?

समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रिषभ पंतचे एक ऑपरेशन पुर्ण झाले आहे. या ऑपरेशननंतर रिषभने चांगला प्रतिसादही दिला असून त्याच्या तब्बेतीत सुधारणा होत आहे. ही सर्जरी डाव्या पायाच्या गुडघ्यावरील लिगमेंटची करण्यात आली आहे. डॉक्टर दिनेशॉ पादरीवाला यांनी केले आहे. यानंतर आता ३-४ दिवस रिषभला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे.

रिषभचे हे ऑपरेशन तीन तास सुरु होते. या अपघातानंतर रिषभने चांगला प्रतिसाद दिला असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे. या अपघातात रिषभ पंतच्या डोक्याला, पाठीला तसेच पायाला आणि गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याच्यावर डेहराडूनवर उपचार सुरू होते. मात्र बीसीसीआयच्या निर्णयानंतर त्याला एअरलिफ्टने मुंबईच्या कोकीलाबेन रुग्णालयात आणण्यात आले होते.

Rishabh Pant Car Accident
Kolhapur: कोल्हापूर म्हणजे विषय हार्ड! पहिली आंब्याची पेटी धनंजय महाडिकांच्या घरात; खरेदीचा आकडा ऐकून चक्रावून जाल

दरम्यान, रिषभ पंतचा (Rishabh Pant) ३० डिसेंबर रोजी पहाटे अपघात झाला होता. दिल्लीहून डेहराडूनकडे जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे रिषभ पंतने खुलासा केला होता. या अपघातानंतर आता रिषभला सात ते आठ आठवडे प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com