Csk Vs Kkr IPl 2024: शाबास जड्डू शाबास! ३ बळी घेण्यासह रविंद्र जडेजाने बनवला अनोखा विक्रम

Ravindra Jadeja : केकेआरविरुद्ध रविंद्र जडेजानं एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. आयपीएलमध्ये आतापर्यंत असं कोणताही खेळाडू करू शकलेला नाहीये.
Ravindra Jadeja Record In Ipl 2024
Ravindra Jadeja Record

Csk Vs Kkr Ravindra Jadeja Record In Ipl 2024 :

आयपीएल २०२४ चा २२ वा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झाला. सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दमदार विजय मिळवलाय. या सामन्यात सीएसकेचा फिरकीपटू रविंद्र जडेजाने एक विक्रम बनवलाय, असा विक्रम बनणारा जडेजा हा पहिलाच खेळाडू ठरलाय. (Latest News)

सीएसकेचा फिरकीपटू रविंद्र जडेजाने गोलंदाजी करताना हा विक्रम केलाय. आजच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजानं घातक गोलंदाजी केली. केकेआर विरुद्धच्या सामन्यात सीएसकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. जडेजानं या सामन्यात ३ बळी घेतले. याशिवाय क्षेत्ररक्षण करताना त्याने दोन उत्कृष्ट झेलही घेतले. यासह जडेजानं आयपीएलमध्ये १०० झेल पूर्ण केलेत. जडेजाच्या आधी अशी कामगिरी विराट कोहली, सुरेश रैना, किरॉन पोलार्ड आणि रोहित शर्मा यांनी केलीय.

रविंद्र जडेजानं केकेआरविरुद्ध दोन फलंदाजांचे झेल घेतले. जडेजानं आधी तुषार देशपांडेच्या चेंडूवर सलामीवीर फिल सॉल्टचा झेल घेतला. यानंतर त्यानं मुस्तफिजूर रहमानच्या चेंडूवर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरचा झेल घेतला. अय्यरनं ३२ चेंडूत ३४ धावा केल्या. हे दोन झेल घेताच जडेजानं आयपीएलमध्ये १०० झेल पूर्ण केले. त्यानं याबाबतीत रोहित शर्माची बरोबरी केलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान जडेजाने साल्टचा घेतलेला झेलचा व्हिडिओ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तुषार देशपांडे दीपक चहर जागी खेळला. देशपांडेने सीएसकेसाठी पहिले षटक टाकले आणि पहिल्याच पहिल्याच चेंडूवर तुषार देशपांडेने सीएसकेला यश मिळवून दिले. तुषारच्या चेंडूवर रविंद्र जडेजाने फिल सॉल्टचा अप्रतिम झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होतोय.

आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक

  • ११० – विराट कोहली

  • १०९ – सुरेश रैना

  • १०३ – किरॉन पोलार्ड

  • १०० – रोहित शर्मा

  • १०० – रवींद्र जडेजा

  • ९८ – शिखर धवन

केकेआरविरुद्ध रविंद्र जडेजानं ४ षटकांत १८ धावा देत ३ बळी घेतले. या सामन्यात जडेजानं सुनील नारायण, अंगकृश रघुवंशी आणि व्यंकटेश अय्यरला बाद केलं. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत १६ एका सामन्यात ३ बळी घेतलेत. याबाबतीत त्यानं उमेश यादव आणि राशिद खान यांची बरोबरी केलीय. या दोघांनीही आयपीएलमध्ये आतापर्यंत १६ वेळा एका सामन्यात ३ विकेट घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा ३ बळी घेणारे गोलंदाज

  • २० – युजवेंद्र चहल

  • २० – जसप्रीत बुमराह

  • १९ – लसिथ मलिंगा

  • १७ – अमित मिश्रा

  • १६– ड्वेन ब्राव्हो

  • १६ – उमेश यादव

  • १६ – राशिद खान

  • १६ – रविंद्र जडेजा

या सामन्यात रवींद्र जडेजानं अजून विक्रम आपल्या नावे केलाय. आयपीएलमध्ये आतापर्यंत असं कोणताही खेळाडू करू शकलेला नाहीये. रविंद्र जडेजा आयपीएलमध्ये १००० पेक्षा अधिक धावा, १०० पेक्षा अधिक बळी आणि १०० पेक्षा अधिक झेल घेणारा पहिला खेळाडू बनलाय.

Ravindra Jadeja Record In Ipl 2024
CSK vs KKR, IPL 2024: 'बाज की नजर ओर जडेजा का कॅच'! पापणी झपकण्याआधीच जडेजाने पकडला सॉल्टचा झेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com