GT VS CSK Match Prediction: गुजरातचा हा एकच खेळाडू संपुर्ण CSK संघावर पडणार भारी! कामगिरी एकदा पाहाच

GT vs CSK Match Details: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर आज आयपीएल २०२३ स्पर्धेतील क्वालिफायरचा पहिला सामना रंगणार आहे
gujarat titans
gujarat titanssaam tv

GT VS CSK, IPL 2023: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर आज आयपीएल २०२३ स्पर्धेतील क्वालिफायरचा पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या सामन्यावर सर्वांचेच लक्ष लागून असणार आहे.

साखळी फेरीतील सामन्यांमध्ये जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्यावेळी घरच्या मैदानावर गुजरात टायटन्स संघाने ५ गडी राखून विजय मिळवला होता.

gujarat titans
5 Flop Players In IPL 2023: नाम बडे और दर्शन छोटे..कोट्यवधींची बोली लावूनही फ्लॉप ठरलेले ५ खेळाडू

गुजरात टायटन्स संघाबद्दल बोलायचं झालं तर मोहम्मद शमी आणि राशिद खान हे दोन्ही गोलंदाज संघासाठी चांगली कामगिरी करत आहेत. हे दोघेही पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप २ गोलंदाजांच्या यादीत आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाची जबाबदारी ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉन्व्हे या जोडीवर असणार आहे. या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे.

गुजरातसाठी हा संघ ठरणार हुकमी एक्का..

हा सामना चेन्नईच्या खेळपट्टीवर रंगणार आहे. याच खेळपट्टीचा अंदाज घेत माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागने म्हटले की, 'चेन्नईच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे गुजरातचा संघ राशिद खानवर अवलंबून राहू शकतो.

गुजरातसाठी राशिद खान ट्रम्प कार्ड आहे. कारण संघाला जेव्हा गरज असते तेव्हा तो संघाला विजेट्स काढून देत असतो. हार्दिकने त्याचा योग्य वापर केला आहे. तो पार्टनरशिप ब्रेक करतो. या हंगामातील तो सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.' (latest sports updates)

gujarat titans
IPL Players Opportunity In Team India: IPL गाजवलेले हे ३ खेळाडू आता क्रिकेट विश्व गाजवणा! लवकरच मिळू शकते टीम इंडियात संधी

संजय मांजरेकर काय म्हणाले?

या सामन्याबद्दल बोलताना संजय मांजरेकर म्हणाले की, 'दोन्ही संघ मजबूत संघ आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये कुठलाही बदल होणार आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, वृद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पंड्या, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, यश दयाल, मोहित शर्मा.

चेन्नई सुपर किंग्ज: डेवोन कॉनव्हे ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चाहर, महीष थिक्षणा, मथीषा पथिराना, तुषार देशपांडे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com