PBKS vs RR: पंजाबचे शेर फलंदाजीत 'Fail'; राजस्थान रॉयल्ससमोर १४८ धावांचे माफक आव्हान

Punjab Kings vs Rajasthan Royals : आयपीएलच्या २७व्या सामन्यात पंजाब किंग्जसमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे.
PBKS vs RR: पंजाबचे शेर फलंदाजीत 'Fail'; राजस्थान रॉयल्ससमोर १४८ धावांचे माफक आव्हान
Published On

चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सचा सामना होत आहे. यंदाच्या आयपीएलमधील हा २७व्या सामना आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत पंजाबच्या संघाने राजस्थान रॉयल्स संघासमोर माफक १४८ धावांचे आव्हान दिले आहे. (Latest News)

या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर पंजाबचे शेर फलंदाज मैदानात उतरले परंतु चांगला खेळ करण्यात अपयशी ठरले. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने उत्तम कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली. प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाने २० षटकांत ८ विकेट गमावत १४७ धावा केल्या. आता राजस्थानला विजयासाठी १४८ धावांचे माफक आव्हान मिळाले आहे. या सामन्यात पंजाबचा कर्णधार शिखर धवन मैदानात उतरला नाहीये. त्याच्या जागी सॅम करनला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीय.

आज पंजाबच्या संघाने खराब खेळ केला. अवघ्या ७२ धावात ५ विकेट गमावल्या होत्या. मागील सामान्यात हिरो ठरलेला शशांक सिंह या डावात चांगली खेळी करण्यात अपयशी ठरलाय. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पंजाब संघाच्या आशुतोष शर्माने ३१ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ८ बाद १४७ धावा केल्या. पंजाबच्या संघाकडून अथर्व तायडे आणि बेअरस्टो यांनी प्रत्येकी १४ धावांची तर प्रभसिमरन सिंगने १० धावांची खेळी खेळली.

कर्णधार सॅम करनला मोठी खेळी करता आली नाहीये. तर जितेश शर्माने २४ चेंडूत २९ धावांची खेळी खेळली. राजस्थान संघाकडून गोलंदाजी करताना आवेश खान आणि केशव महाराज यांनी २-२ बळी घेतले. तर ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दरम्यान पॉइंट टेबलमध्ये राजस्थान पहिल्या स्थानावर आहे. या संघाने ५ पैकी ४ सामने जिंकलेत. राजस्थानच्या खात्यात ८ गुण आहेत. तर दुसरीकडे पंजाबला आतापर्यंत केवळ २ विजय मिळालेत. पंजाबने ५ पैकी ३ सामने गमावलेत. पॉइंट टेबल मध्ये ते ८व्या स्थानावर आहे.

असे आहेत संघातील खेळाडू

राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.

पंजाब किंग्स : जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा.

PBKS vs RR: पंजाबचे शेर फलंदाजीत 'Fail'; राजस्थान रॉयल्ससमोर १४८ धावांचे माफक आव्हान
RR vs PBKS: युजवेंद्र चहल इतिहास रचणार? IPLमध्ये झळकावणार अनोखे 'दुहेरी शतक'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com