MI vs PBKS: मुंबईचा पंजाबवर निसटता विजय; पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल

MI vs PBKS: मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्समध्ये आयपीएलचा ३३ वा सामना झाला. हा चंदीगड येथील मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ९ धावांनी विजय मिळवला.
MI vs PBKS  IPl 2024
MI vs PBKS IPl 2024X IPl

Punjab Kings vs Mumbai Indians :

आयपीएल २०२४ च्या ३३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आले. हा सामना चंदीगड येथील मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये भरारी घेतलीय.

पॉइंट्स टेबलच्या पायथ्याशी असलेल्या दोन्ही संघांनी एकमेंकाना जबरदस्त झुंज दिली. प्रथम फलंदाजी करत मुंबईच्या संघाने १९२ धावा करत पंजाबला १९३ धावांचे आव्हान दिलं होतं. सूर्यकुमार यादवची स्फोटक खेळी आणि जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी यांच्या किलर गोलंदाजीने मुंबई इंडियन्सला तिसरा विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकापर्यंत धाकधूक वाढवणाऱ्या सामन्यात पंजाब किंग्सचा ९ धावांनी पराभव झाला. या विजयाने मुंबई संघाने पॉइंट्स टेबलवर भरारी घेतलीय. टेबल्या तळाशी गेलेल्या एमआय संघाने थेट ७ नंबर वर उडी घेतलीय.

सूर्यकुमारने फलंदाजीत, गोलंदाजीत चमक दाखवत बुमराहने एकाच षटकात २ बळी घेत पंजाबला जबरदस्त धक्का दिला. मुंबईने दिलेल्या १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला पंजाबचा संघ १९.१ षटकात १८३ धावांवर गारद झाला. मुंबईतर्फे जसप्रीत बुमराह आणि कोएत्झी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

मुंबईने दिलेल्या १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात खूपच खराब झाली. पंजाबने तिसऱ्याच षटकातच त्यांनी सुरुवातीचे ४ फलंदाजाच्या विकेट गमावल्या होत्या. गेराल्ड कोएत्झीने सलामीवीर प्रभसिमरन सिंगला खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवले, तर जसप्रीत बुमराहने रिले रोसोला बाद केलं.

कर्णधार सॅम करनही खास कमाल करू शकला नाही. तो फक्त ६ धावांवर बाद झाला, त्याची विकेट बुमराहने घेतली. श्रेयस गोपालने हरप्रीत भाटियाला बाद केलं. आकाश मधवालने जितेश शर्माला पायचीत केले. त्यानंतर बुमराहने शशांक सिंगला बाद करत आपले तीन विकेट पूर्ण केलेत. त्याने ४१ धावा केल्या होत्या. आशुतोष शर्माला कोएत्झीने ६१ धावांवर बाद केलं.

MI vs PBKS  IPl 2024
Rishabh Pant Catch: रिषभ पंतचा सुपरमॅन स्टाईल कॅच! व्हिडिओ पाहून म्हणाल क्या बात.. - Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com