
Is Adar Poonawalla buying Virat Kohli’s RCB team? : विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबी (RCB) संघाला लवकरच नवीन मालक मिळण्याची शक्यता आहे. देशातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या आयपीएल संघाची खरेदी करण्याची तयारी पुणेकर बिझनेसमन आणि सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी दर्शवली आहे. आरसीबीचे मालक डियाजिओ यांच्यासोबत अदार पूनावाला यांची चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७५५३ कोटींमध्ये ही डील होऊ शकते. डियाजियो पूर्ण संघ विकणार आहेत, की त्यामधील हिस्सेदारी विकणार असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. डियाजियो ही पीएलसी यूनाइटेड स्पिरिट्स या कंपनीचीच एक पॅरेंट कंपनी आहे. ( Virat Kohli’s RCB Set for Record Sale Deal Worth ₹17,553 Crore )
सूत्रांनुसार, आरसीबी खरेदी करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. पण अदार पूनावाला यांना सर्वात मोठे दावेदार मानले जातेय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रिटिश कंपनीने आरसीबीची किंमत 2 अब्ज डॉलर (17,553 कोटी रुपये) ठेवण्याचा विचार करत आहे.
आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी एक्सवर आरसीबीबाबत एक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.
Houlihan Lokey च्या IPL व्हॅल्यूयशन स्टडी रिपोर्ट्सनुसार, यंदा बिझनेस व्हॅल्यूमध्ये आरसीबीचा संघ अव्वल क्रमांकावर आहे. आरसीबीचं यश मैदानाबाहेरही दिसतेय. फ्रेंचायजीने टेक इनोवेटर Nothingला असोसिएटसला आपलं स्पॉन्सर केलेय. कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये सामन्यावेळी वेगळेच वातावरण असते. त्याशिवाय डिजिटल मार्केटिंग आणि जागतिक आयकॉन्सच्या उपस्थितीने RCB ची ब्रँड व्हॅल्यू आणखी वाढली आहे.
अहमदाबादमधील टॉरेंट ग्रुपने फेब्रुवारीमध्ये गुजरात टायटन्समध्ये ६७% हिस्सेदारी खरेदी केली. ही डील ५००० कोटी रुपयांत झाली. गुजरात टायटन्सचे मूल्य अंदाजे ७,४५३ कोटी रुपये ठरले. आता आरसीबी संघही विकला जाण्याची शक्यता आहे. आरसीबीसी कोण कोण बोली लावतेय, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.