
पुणे : येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुण्यात महाराष्ट्र प्रीमियर लीगचे ४ जूनपासून आयोजन करण्यात आलं असून यामध्ये महाराष्ट्रातील युवा तथा उत्साही क्रिकेटपटू आपली कौशल्य दाखवत आहेत. ७ जून रोजी पुणेरी बाप्पा आणि रायगड रॉयल्स या दोन संघात सामना सुरू होता. या सामन्यात एक विचित्र पद्धतीचा रन आऊट पाहायला मिळाला. फलंदाजाच्या स्ट्राईकवरील स्टंपवर मारलेला चेंडू नॉन स्ट्राईकरच्या स्टंपवर जाऊन नॉन स्ट्राईकर आऊट झाल्याची आगळीवेगळी घटना क्रिकेट विश्वात पाहायला मिळाली. यापूर्वी २०२२च्या एमपीएल सामन्यात आंद्रे रसेलही अशाच प्रकारे आऊट झाला होता.
रायगड रॉयल्सचा सलामीवीर सिद्धेश वीरने रामकृष्ण घोषचा चेंडू लेग साईडकडे टोलवला आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. वीरने लगेच ही धाव घेण्यास नकार दिला. कारण, विकेटकीपरने चेंडू पटकन ताब्यात घेतल्याचं त्यानं पाहिलं. स्ट्राईकवर उभा असलेला वीर धाव घेण्यासाठी पुढे सरकला, परंतु तो लगेच परत आला, तर नॉन-स्ट्राईक एंडवर उभा असलेला हर्ष मोगवीराला क्रीजवर पोहोचता आलं नाही. आता वीर धाव घेण्यासाठी पुढे सरकताच, विकेटकीपर सूरज शिंदेने चेंडू फेकला आणि तो थेट स्टंपवर गेला, परंतु वीर क्रीजवर पोहोचल्याने तो धावबाद झाला नाही. मात्र, सूरजने टाकलेला चेंडू विकेटवर आदळला त्यानंतर नॉन-स्ट्राईकर एंडवरील स्टंपवर आदळला. आता, नॉन-स्ट्राईकर एंडवर खेळणारा मोगवीराला क्रीजवर वेळत पोहोचता न आल्यानं तो धावबाद झाला. विशेष म्हणजे मोगवीराने त्याचं खातंही उघडलं नव्हतं आणि अशा प्रकारे बाद झाल्याने तो आश्चर्यचकित झाला.
कोण आहे सूरज शिंदे?
या विचित्र रन आऊटच्या मागे पुणेरी बाप्पा संघाचा उपकर्णधार विकेटकिपर फलंदाज सूरज शिंदे हा आहे. तो या संघाचे एमपीएलमध्ये ३ सिजन पासून प्रतिनिधित्व करत आहे. सूरज हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मूळचा रहिवासी आहे. सध्या तो उंद्री पुणे येथे गेल्या १० वर्षांपासून प्रोफेशनल क्रिकेट खेळत आहे. त्याने आतापर्यंत महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील आणि २५ वर्षाखालील क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.