IPL 2023, KKR vs DC: दिल्ली कॅपिटल्सचा भेदक मारा; कोलकाताची फलंदाजी ढेपाळली, विजयासाठी अवघं १२६ धावांचं लक्ष्य

KKR vs DC Match Updates: दिल्लीच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर जेसन रॉय आणि आंद्रे रसेल वगळता केकेआरचा एकही फलंदाज तग धरून शकला नाही.
IPL 2023, KKR vs DC Match Updates:
IPL 2023, KKR vs DC Match Updates: IPL 2023, Twitter

IPL 2023, KKR vs DC Match Updates: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील २९ वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात होत आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीपुढे विजयासाठी अवघं १२६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर जेसन रॉय आणि आंद्रे रसेल वगळता केकेआरचा एकही फलंदाज तग धरून शकला नाही. (Latest sports updates)

IPL 2023, KKR vs DC Match Updates:
IPL 2023: आरसीबीने एकाच दगडात मारले दोन पक्षी; पंजाब पाठोपाठ मुंबईला इंडियन्सलाही दिला मोठा धक्का!

अक्षर पटेल, कुलदीप यादव, ईशांत शर्मा आणि अनरिख नॉर्खिया यांच्या भेदक गोलंदाजीसमोर कोलकात्याच्या फलंदाजांनी नांगी टाकली. प्रथम फलंदाजी करताना कोलकात्याचा संघ निर्धारित २० षटकात १२७ धावांपर्यंत मजल मारु शकला. पावसामुळे उशीरा सुरू झालेल्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

दिल्लीच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. दिल्लीने पॉवर प्लेमध्ये केकेआरला एकापाठोपाठ एक तीन धक्के दिले. मुकेश कुमारने लिटन दासला ४ तर नॉर्खियाने व्यंकटेश अय्यरला शुन्यावर बाद केले. पाठोपाठ इशांत शर्माने देखील नितीश राणाला ४ धावांवर बाद करत तिसरा धक्का दिला

दरम्यान, सलामीवीर जेनस रॉयने एकाकी झुंज देत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पॉवर प्लेमध्ये ३ विकेट्स गमावलेल्या केकेआरचा डाव रॉय आणि मनदीप सिंग सावरणार असे वाटत असतानाच दिल्लीच्या अक्षर पटेलने मनदीप सिंगला १२ तर रिंकू सिंहला ६ धावांवर बाद केले. यामुळे केकेआरची अवस्था ५ बाद ६४ अशी झाली.

त्यानंतर एकाकी झुंड देणारा जेसन रॉयही माघारी परतला. रॉयने ३९ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. अखेरच्या काही षटकांत आंद्रे रसेलने फटकेबाजी करत केकेआरला १२० धावांचा टप्पा पार करून दिला. आंद्रे रसेलने ३१ चेंडूत ३८ धावा केल्या. यामध्ये ४ षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. दिल्लीकडून इशान शर्मा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ऑनरिक नॉर्खियाने प्रत्येकी २ गड्यांना बाद केलं. याशिवाय मुकेश कुमारलाही एक विकेट्स मिळाली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com