PBKS VS RCB 1st Inning: विराट- डू प्लेसिसची झुंजार खेळी! पंजाबला विजयासाठी १७५ धावांचे आव्हान

PBKS VS RCB Live Updates: आयपीएल २०२३ स्पर्धेतील २७ वा सामना पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे.
virat kohli and faf du plessis
virat kohli and faf du plessis saam tv
Published On: 

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील २७ वा सामना पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर प्रथम फलंदाजी करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जोरदार कामगिरी करत १७४ धावांचा डोंगर उभारला आहे. तर पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७५ धावांची गरज आहे.

virat kohli and faf du plessis
MS Dhoni Ban In IPL? : CSK च्या फॅन्सला मोठा धक्का! IPL मध्ये धोनीवर बंदी येणार? वाचा काय आहे कारण

फाफ- विराटची अप्रतिम भागीदारी..

या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजी कारण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने अप्रतिम फलंदाजी केली. या डावात दोघांमध्ये १३७ धावांची भागीदारी झाली.

दरम्यान विराट कोहलीने ५९ आणि फाफ डू प्लेसिसने ८४ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. इतर कुठल्याही फलंदाजांची साथ न मिळाल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ४ गडी बाद १७४ धावा करता आल्या. जर साथ मिळाली असती तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २०० धावांचा पल्ला गाठला असता.

virat kohli and faf du plessis
Virat Kohli Record: कोहलीचा ‘विराट’ कारनामा! आजपर्यंत IPL स्पर्धेत कोणत्याच फलंदाजाला न जमलेला विक्रम केला नावावर

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग 11:

पंजाब किंग्ज:

अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:

विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.