Women Individual Archery: तिरंदाजीत भारतीय खेळाडूंचा निशाणा चुकला; दीपिकाची मजल फक्त उपांत्यपूर्व फेरीपर्यंत; तर भजनचा प्रवास अंतिम १६ मध्ये संपृष्टात

Paris Olympics Women Individual: अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारी आणि भजन कौर आज महिलांच्या वैयक्तिक गटात आव्हान देण्यासाठी उतरल्या. उपांत्यपूर्व फेरीतच भजनाचा प्रवास संपला. तर, दीपिकाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता, मात्र उपांत्य फेरी गाठू शकली नाही.
Women Individual Archery: तिरंदाजीत भारतीय खेळाडूंचा निशाणा चुकला; दीपिकाची मजल फक्त उपांत्यपूर्व फेरीपर्यंत; तर भजनचा प्रवास अंतिम १६ मध्ये संपृष्टात
Women Individual Archery
Published On

भारताच्या अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारी आणि भजन कौर शनिवारी महिलांच्या वैयक्तिक गटात आव्हान सादर करण्यासाठी आल्या होत्या. उपांत्यपूर्व फेरीत भजन कौर इंडोनेशियाच्या चोरुनिसा डायंडाविरुद्ध पराभूत झाली. तर दीपिकाने अंतिम-16 फेरीत जर्मनीच्या मिशेल क्रॉपेनचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आठ सामन्यांमध्ये आघाडी घेतल्यानंतरही दीपिकाला पराभवाला सामोरे जावे लागले.

दीपिकाने पहिला सेट २८-२६ असा जिंकला होता, तर कोरियाच्या सु येओनने दुसऱ्या सेटमध्ये दीपिकाचा २८-२५ असा पराभव केला होता. यानंतर दीपिकाने तिसरा सेट २९-२८ अशा फरकाने जिंकला, तर सु येऑनने चौथ्या सेटमध्ये पुनरागमन करत हा सेट २९-२७ असा जिंकला आणि ४-४ अशी बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये दीपिका मागे पडली आणि सु येऑनने हा सेट २९-२७ असा जिंकला आणि दीपिकाला ६-४ अशा फरकाने पराभूत केले. याप्रकारे दीपिकाचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच संपला.

पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये सू येओनने सुरुवात केली आणि १०,९, १० करत २९ गुण मिळवले, तर दीपिकाने ९, ९ गुण मिळवले आणि तिला केवळ २७ गुण मिळू शकले. अशाप्रकारे सु येऑनने पाचवा सेट जिंकून सामना जिंकला. उपांत्य फेरीत प्रवेश केला. अशाप्रकारे महिलांच्या वैयक्तिक गटातील दीपिका कुमारीचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. सु येऑनने दीपिकाचा ६-४ अशा फरकाने पराभव केला.

सू येओनने चौथ्या सेटची सुरुवात करत १०,९, १० गुणांसह २९ गुण मिळवले, तर दीपिकाने १०, ७, १० गुणांसह २७ गुण मिळवले. अशाप्रकारे सु येऑनने चौथा सेट जिंकून पुन्हा एकदा गुणसंख्येत ४-४ अशी बरोबरी साधली. आता पाचव्या सेटपासून विजेता निश्चित होण्यास सुरुात झाली. यात सू येओनने विजय मिळवला.

Women Individual Archery: तिरंदाजीत भारतीय खेळाडूंचा निशाणा चुकला; दीपिकाची मजल फक्त उपांत्यपूर्व फेरीपर्यंत; तर भजनचा प्रवास अंतिम १६ मध्ये संपृष्टात
Paris Olympic : मनु भाकरचा सुवर्णवेध थोडक्यात हुकला, २८ गुणांसह चौथ्या स्थानी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com