Pakistan World Cup Squad: वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा! टीम इंडियाला नडणाऱ्या खेळाडुला डच्चू; पाहा १५ सदस्यीय संघ

World Cup 2023: वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Pakistan World Cup 2023  squad announced naseem Shah rested Hasan ali made comeback
Pakistan World Cup 2023 squad announced naseem Shah rested Hasan ali made comeback PCB Twitter
Published On: 

Pakistan World Cup 2023 Team:

आगामी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा भारतात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी जवळ जवळ सर्वच संघांनी आपल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी पाकिस्तानने देखील आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ज्यात संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजाला विश्रांती देण्यात आली आहे.

Pakistan World Cup 2023  squad announced naseem Shah rested Hasan ali made comeback
IND vs AUS,1st ODI: पहिल्या वनडेत राहुलचा टॉस जिंकत फिल्डींगचा निर्णय; ५ बदलांसह उतरणार मैदानात

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाचे उपकर्णधारपद शादाब खानकडे सोपवण्यात आले आहे. तर संघातील प्रमुख युवा गोलंदाज नसीम शाहला संघात स्थान दिलं गेलं नाही.

आशिया चषक सुरू असताना तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी हसन अलीचा या संघात समावेश करण्यात आला आहे.

हसन अली जून २०२२ पासून संघाबाहेर आहे. तो वेस्टइंडिजविरूद्ध आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी उतरला होता. आता नसीम शाहच्या अनुपस्थितीत त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या ६० सामन्यांमध्ये ९१ गडी बाद केले आहेत. पाकिस्तानने हटके पद्धतीने संघाची घोषणा केली आहे. वर्ल्डकपसाठी संघात स्थान मिळवलेल्या खेळाडूंचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. (Latest sports updates)

भारत- पाकिस्तान लढत..

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. हे दोन्ही संघ १४ ऑक्टोबर रोजी आमने सामने येणार आहेत. हा सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार होता. मात्र काही कारणास्तव हा सामना १४ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

आगामी वनडे वर्ल्डकपसाठी असा आहे पाकिस्तानचा संघ:

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ ,इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com