पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप; भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या माजी क्रिकेटपटूचा राजीनामा

Gary Kirsten Resigns: पाकिस्तान टीमचा विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवानची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता पाकिस्तानच्या टीममधून अजून एक मोठी बातमी समोर येतेय.
Gary Kirsten Resigns
Gary Kirsten Resignssaam tv
Published On

पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये नुकतेच काही मोठे बदल झाले आहेत. यामध्ये टीमचा विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवानची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. रविवारी लाहोरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. याशिवाय शान मसूद टेस्टमध्ये कर्णधार राहणार आहे. मात्र आता पाकिस्तानच्या टीममधून अजून एक मोठी बातमी समोर येतेय.

गॅरी कर्स्टन यांनी सोडलं कोचपद

पाकिस्तानच्या टी-20 आणि वनडे टीमचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी त्यांच्या कोच पदाचा राजीनामा दिलाय. कर्स्टन यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एप्रिल 2024 मध्ये दोन वर्षांच्या करारावर नियुक्ती केली होती. परंतु सहा महिन्यांनंतर त्यांनी पद सोडल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

गॅरी कर्स्टन कोच असताना टीम इंडियाने २०११ साली क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता. आता जेसन गिलेस्पी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाकिस्तानच्या टीमचे कोच असणार आहे. गिलेस्पी हे पाकिस्तानच्या टेस्ट टीमचे मुख्य प्रशिक्षकही आहेत.

Gary Kirsten Resigns
Team India: न्यूझीलंड सिरीजमध्ये 'हा' खेळाडू राखू शकतो टीम इंडियाची लाज; BCCI घेणार का मोठा निर्णय?

का सोडलं कर्स्टन यांनी कोचपद?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गॅरी कर्स्टन यांच्याकडून टीम सिलेक्शनचे अधिकार काढून घेतले असल्याची माहिती आहे. हा अधिकार फक्त निवड समितीकडे होता. या समितीचा भाग कर्स्टन नव्हते. यामुळे कर्स्टन नाराज असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर कर्णधारपदासाठी रिझवानच्या नियुक्तीतही कर्स्टन यांचं मत विचारात घेतलं गेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com