
Pakistan Naseem Shah And Azam Khan Clash : पाकिस्तान क्रिकेट टीमची सध्या कुठलीही सीरीज सुरू नाहीये. पण काही खेळाडू हे बांग्लादेश प्रीमिअर लीगमध्ये आपला जलवा दाखवत आहे. मोहम्मद रिजवान, शोएब मलिक, नसीम शाह हॅरिस रौफ हे पाकिस्तानी खेळाडू या टुर्नामेंटचे आकर्षण ठरत आहेत. याशिवाय अष्टपैलू इफ्तिखार अहमदने सुद्धा सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. (Pakistan Cricket Team)
दरम्यान, स्पर्धेत एकीकडे पाकच्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव सुरू असताना दुसरीकडे दोन खेळाडूंवर टीकेचा भडीमार सुद्धा होत आहे. सामना सुरू असताना पाकच्या दोन खेळाडूंनी भर मैदानातच एकमेकांची खिल्ली उडवून धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)
बांग्लादेश प्रीमिअर लीगमध्ये मंगळवारी खुलना टायगर्स आणि कोमिल्ला व्हिक्टोरियन्सच्या संघात लढत झाली. या सामन्यात आझम खान आणि नसीम शाह एकमेकांशी भिडले. सामना सुरू असताना दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. या वादात आझम खान याने नसीमला धक्काबुक्कीही केली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी झालेल्या सामन्यात खुलना टायगर्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी कोमिल्ला व्हिक्टोरियन्सच्या गोलंदाजांची चांगलीच हवा काढली. १९ षटकांत खुलना टायगर्सची धावसंख्या २०० च्या पार पोहचली. २० व्या षटकात आझम खान फलंदाजीसाठी आला. तेव्हा कोमिल्ला व्हिक्टोरियन्सचा गोलंदाज नसीम शाह त्याच्याशी जबरदस्तीने टक्कर देत होता.
सुरूवातीला आझम खानने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, नसीम शाहने अति केल्याने त्याने थेट नसीमला धक्काबुक्की केली. नसीम खान जवळ आल्यानंतर आझम खानने त्यांना हाताने ढकलले. मात्र त्यानंतर नसीम शाह याने असे कृत्य केले जे वादाचे कारण बनले. आझम खानने धक्का दिल्यानंतर नसीमने त्याची खिल्ली उडवली.
नसीमने आझमच्या लठ्ठपणावरून त्याची खिल्ली उडवली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. नसीमच्या या कृत्याने क्रिकेटप्रेमी त्याला ट्रोल करत आहेत. आझम खानचे वजन ११० किलोपेक्षा जास्त आहे. मात्र, असे असून सुद्धा त्याची फिटनेस कमालीची आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.