Pakistan Cricket AI: AI निवडणार पाकिस्तानचा संघ; वाचा PCB कसा करणार वापर

Pakistan Cricket Team Selection Using AI: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता AI चा वापर करुन संघाची निवड करणार आहे. दरम्यान कसा करणार वापर? जाणून घ्या.
Pakistan Cricket AI: AI निवडणार पाकिस्तानचा संघ; वाचा PCB कसा करणार वापर
PAKISTAN CRICKET TEAMYANDEX
Published On

पाकिस्तानचा फ्लॉप शो काही थांबायचं नाव घेत नाहीये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला आपल्याच होम ग्राऊंडवर बांगलादेशकडून १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खेळाडूंची सुट्टी करण्यासाठी AI ची मदत घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्यने कोणता खेळाडू चांगली कामगिरी करतोय, कोणता खेळाडू फ्लॉप ठरतोय याचं मुल्यांकन केलं जाणार आहे.

Pakistan Cricket AI: AI निवडणार पाकिस्तानचा संघ; वाचा PCB कसा करणार वापर
Pakistan Cricket Team: ICC मुळे पाकिस्तानचा संघ सुपर 8 मध्ये पोहचू शकला नाही,माजी कर्णधाराचा मोठा आरोप

AI ची मदत घेऊन खेळाडूंची निवड

आता सगळीकडेच AI तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. दरम्यान क्रिकेटमध्येही AI तंत्रज्ञानाचा वापर करुन खेळाडूंची निवड केली जाणार आहे. मोहसिन नकवी यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडू कशी कामगिरी करत आहेत, याचं मुल्यांकन AI चा वापर करुन केलं जाणार आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनूसार, पाकिस्तानमधील एका स्पर्धेसाठी १५० खेळाडूंची निवड करण्यात आली होती. यापैकी ८० टक्के खेळाडूंची निवड ही AI च्या साहाय्याने करण्यात आली होती. तर उर्वरीत २० टक्के खेळाडूंची निवड ही माणसांनी केली होती.

यासह ते पुढे म्हणाले की, चॅम्पियन्स कप स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीचं मुल्यांकन हे AI द्वारे केले जाणार आहे. जे खेळाडू चांगली कामगिरी करतील,ते राहतील. फ्लॉप कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. यात कोणाचंही वैयक्तिक मत नसणार आहे.

Pakistan Cricket AI: AI निवडणार पाकिस्तानचा संघ; वाचा PCB कसा करणार वापर
Champions Trophy 2025: 'स्टेडियममध्ये ना धड सीट, ना बाथरुम...' PCB अधिकाऱ्याकडूनच पाकिस्तानची पोलखोल

तसेच खेळाडूंच्या सिलेक्शनबाबत बोलताना पीसीबी अध्यक्ष म्हणाले की,' ज्या १५० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ९० टक्के खेळाडूंची निवड ही AI च्या साहाय्याने करण्यात आली आहे. तर २० टक्के खेळाडूंची निवड ही माणसांनी केली.जर आम्ही एखाद्या खेळाडूला बाहेर केलं, तर तुम्ही आम्हाला जाब विचारायचे. आता आमच्याकडे रेकॉर्ड आहेत. आता आम्हालाही पाहता येईल की, कोणाचा रेकॉर्ड चांगला आहे आणि कोण संघात स्थान मिळवण्यासाठी दावेदार आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com