Rachin Ravindra : पाकिस्तानमध्ये रचिन रविंद्रचा घात, कॅच पकडायला गेला अन्.. रक्ताळलेल्या स्थितीत सोडलं मैदान! | VIDEO

NZ Vs Pak : पाकिस्तानमध्ये तिरंगी मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये न्यूझीलंडने पाकिस्तानवर ७२ धावांना विजय मिळवला. सामन्यादरम्यान न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रला दुखापत झाली.
Rachin ravindra injury video
Rachin ravindra injury videoSaam Tv
Published On

Rachin Ravindra Injury : न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या तीन देशांची तिरंगी मालिका सध्या पाकिस्तानमध्ये सुरु आहे. काल या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. सामन्यामध्ये न्यूझीलंडने पाकिस्तानचा ७२ धावांनी पराभव केला. पण सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा सामनावीर रचिन रवींद्र गंभीररित्या जखमी झाला.

कालच्या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या संघाने ५० षटकांमध्ये ३३० धावा केल्या. पुढे पाकिस्तानचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरले. सामन्याच्या ३८ व्या षटकामध्ये पाकिस्तानच्या खुशदिल शाहने शॉट मारला आणि बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. तेथे रचिन रवींद्र उभा होता. त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात बॉल त्याच्या कपाळावर लागला.

रचिन रवींद्रच्या चेहऱ्याला बॉल जोरात लागल्याने रक्त यायला सुरुवात झाली. बॉल कपाळाला लागल्याने तो खाली पडला. काही सेकंदांसाठी त्याचे भान हरपले. त्याला नीट दिसत नव्हते. दुखापत झाल्यानंतर फिजिओने मैदानातच त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. लगेचच त्याला मैदानाच्या बाहेर नेण्यात आले. मैदानातील फ्लड लाइट्समुळे त्याला बॉल पकडताना त्याचा अंदाज चुकला असे म्हटले जात आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाने दिलेल्या माहितीनुसार, रचिन रवींद्रच्या कपाळाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Rachin ravindra injury video
India vs England Seond ODI: अय्यर, गिल की...! दुसऱ्या वनडेत कोहलीचं कमबॅक, कोणाचा पत्ता होणार कट? भारताची संभाव्य प्लेइंग ११

ही तिरंगी मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सराव म्हणून खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा न्यूझीलंडने धुवा उडवला. न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्सने शतकीय खेळी केली. तर पाकिस्तानकडून सलामीवीर फखर जमानने सर्वाधिक धावा ८४ धावा केल्या.

Rachin ravindra injury video
IND vs ENG: जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? सस्पेंस कायम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com