इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभव पाकिस्तानचा संघ कधीच विसरू शकणार नाही. पहिल्या डावात ५०० धावांचा डोंगर उभरूनही पाकिस्तानला एक डाव राखून पराभवाचा सामना करावा लागला.
मालिकेतील दुसऱ्या सामन्याला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर मालिकेतील तिसरा सामना २४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने संघात मोठा बदल केला आहे. शेवटच्या दोन्ही कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून प्रमुख खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डने जाहीर केलेल्या संघात बाबर आझम, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यासह सरफराज अहमद आणि अबरार अहमदला देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बाबर आझम गेल्या काही महिन्यांपासून सुपरफ्लॉप ठरतोय.
त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डने त्याला बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूंना बाहेर करून मेहरान मुमताज, कामरान गुलाम, साजिद खान, मोहम्मद अली, नोमान अली आणि जाहीद महमूद यांना संधी देण्यात आली आहे.
पहिल्या कसोटीतील फ्लो शो नंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डने नवीन निवड समिती स्थापन केली आहे. या समितीच्या मते, बाबर आझमला विश्रांतीची गरज आहे. बाबर आझम सतत क्रिकेट खेळतोय. मात्र २०२२ पासून त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही.
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या शेवटच्या २ कसोटी सामन्यासाठी असा आहे पाकिस्तानचा संघ :
शान मसूद (कर्णधार), सऊद शकील (उप-कर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसीबुल्लाह (यष्टिरक्षक), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरेरा, मोहम्मद रिजवान (यष्टिरक्षक), नोमान अली, सेमअयूब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद महमूद.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.