Babar Azam: रिप्लेसमेंट म्हणून आला अन् शतक झळकावलं; बाबर आझमने दिलेली रिॲक्शन व्हायरल

Babar Azam On Kamran Ghulam: बाबर आझमची रिप्लेसमेंट म्हणून आलेल्या कामरान गुलामने पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं आहे.
Babar Azam: रिप्लेसमेंट म्हणून आला अन् शतक झळकावलं; बाबर आझमने दिलेली रिॲक्शन व्हायरल
babar azamtwitter
Published On

इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला लज्जास्पद पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने संघात बदल करण्याचा निर्णय घेतला.

बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दरम्यान बाबर आझमची रिप्लेसमेंट म्हणून संघात आलेल्या कामरान गुलामने पहिल्याच सामन्यात शानदार शतकी खेळी केली. या खेळीनंतर बाबर आझमने दिलेली रिॲक्शन तुफान व्हायरल होत आहे.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने अवघ्या २९ धावांवर २ गडी गमावले होते. त्यानंतर कामरान गुलाम फलंदाजीसाठी आला. त्याने शान मसूदसोबत मिळून चौथ्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवशी फलंदाजी करताना पाकिस्तानने ५ गडी बाद २५९ धावा केल्या आहेत.

Babar Azam: रिप्लेसमेंट म्हणून आला अन् शतक झळकावलं; बाबर आझमने दिलेली रिॲक्शन व्हायरल
IND vs NZ: पहिल्या दिवसाचा खेळ रद्द होणार? बंगळुरुतून समोर आली मोठी अपडेट

बाबर आझमची रिॲक्शन व्हायरल

कामरान गुलामने शतक झळकावल्यानंतर बाबर आझमने दिलेली रिॲक्शन तुफान व्हायरल होत आहे. बाबर आझमने कामरान गुलामचे २ फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर कॅप्शन म्हणून त्याने, ' खूप चांगला खेळला.. कामरान.' असं लिहिलं. बाबर आझम पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र या सामन्यात त्याला अवघ्या ३५ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्यात आलं. तर दुसरीकडे कामरान गुलामने पहिल्याच सामन्यात दणदणीत शतक झळकावलं आहे.

Babar Azam: रिप्लेसमेंट म्हणून आला अन् शतक झळकावलं; बाबर आझमने दिलेली रिॲक्शन व्हायरल
IND vs BAN: जलवा है हमारा.. जे रोहित, विराट अन् धोनीलाही नाही जमलं ते सूर्या भाऊने करुन दाखवलं

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानकडून कामरान गुलामने सर्वाधिक ११८ धावांची खेळी केली. तर आयुबने ७७ धावा केल्या. पहिल्या दिवशी पाकिस्तानने ५ गडी बाद २५९ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com