Babar Azam: बाबर आझमची हकालपट्टी? दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार

Pakistan vs England 2nd Test: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाबर आझम बाहेर होऊ शकतो.
Babar Azam: बाबर आझमची हकालपट्टी? दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार
babar azamtwitter
Published On

बाबर आझम हा पाकिस्तान क्रिकेट संघातील दिग्गज फलंदाज आहे. त्याच्या फलंदाजीची तुलना थेट भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसोबत केली जाते. एकेकाळी नंबर १ असणाऱ्या फलंदाजाला आता पाकिस्तानच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणंही कठीण झालंय. बाबर आझमला इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर केलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे.

पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा बदल

सध्या इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ५०० धावा करूनही पाकिस्तान संघाला १ डाव राखून पराभूत व्हावं लागलं आहे. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर नवीन सिलेक्शन कमेटी बनवण्यात आली आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार शान मसूदने बाबर आझमची पाठराखण केली होती. यासह त्याने बाबरला पाकिस्तानचा सर्वश्रेष्ठ फलंदाज असंही म्हटलं होतं. आता नवीन सिलेक्शन कमेटीचं म्हणणं आहे की, बाबर आझमला विश्रांतीची गरज आहे.

Babar Azam: बाबर आझमची हकालपट्टी? दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार
IND vs BAN: जलवा है हमारा.. जे रोहित, विराट अन् धोनीलाही नाही जमलं ते सूर्या भाऊने करुन दाखवलं

पाकिस्तान क्रिकेट बोर्डने नवीन सिलेक्शन कमिटी स्थापन केली आहे. या समितीमध्ये आयसीसीचे माजी अंपायर अलिम दार, आकिब जावेद, असद शफीक, अझहर अली यांचा समावेश आहे.

मात्र या बैठकीत पाकिस्तानचा कर्णधार कोच यांना बोलवण्यात आलं नव्हतं. शनिवारी झालेल्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यात बाबरला संघात ठेवायचं की, विश्रांती द्यायची यावरही चर्चा करण्यात आली. काहींनी त्याला संघाबाहेर करण्याचा सल्ला दिला. तर काहींनी त्याला संघात कायम ठेवण्याचा सल्ला दिला.

Babar Azam: बाबर आझमची हकालपट्टी? दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार
IND vs BAN मालिकेसह या खेळाडूची कारकीर्दही संपली! आधीच केली होती निवृत्तीची घोषणा

हे खेळाडू देखील होऊ शकतात बाहेर

बाबर आझमसह आणखी काही खेळाडू संघाबाहेर होऊ शकतात. ज्यात अबरार अहमदचा देखील समावेश आहे. तो सध्या रुग्णालयात आहे. तो अजूनही पूर्णपणे ठीक झालेला नाही. तर आफ्रिदी देखील दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com