भारताचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचा कोरोना अहवाल (Saurav Ganguly Corona Positive) पॉझिटिव्ह आला आहे. कदाचित सौरव गांगुलीच्या कुटुंबाचीही कोरोना चाचणी करवी लागणार आहे. सौरव गांगुली सध्या कोलकाता मध्ये आहे. सौरव गांगुली सध्या कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
सोशल मीडियावर चाहते सौरव गांगुलीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. सौरव गांगुली गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या तयारीत व्यस्त आहे. गांगुलीला कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉनची लागण तर नाही ना अशीही चाहत्यांमध्ये चर्चा आहे.
सौरव गांगुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच अहवाल ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. म्हणजेच त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. कोरोना विषाणूचा नवीन प्रकार, ओमिक्रॉन सध्या देशासमोरचं नवं संकट आहे. Omicron कोरोनाच्या पूर्वीच्या प्रकारांपेक्षा वेगाने पसरत असल्याचं समोर आलं आहे.
सौरव गांगुली सध्या कोलकात्यात आहे. त्याची पत्नी आणि सौरव गांगुलीच्या कुटुंबातील इतर सदस्य आणि कर्मचाऱ्यांच्या तपासाचे नमुनेही पाठवले जाण्याची शक्यता आहे. गांगुलीने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि तो सतत प्रवास करत असतो. खबरदारी म्हणून सोमवारी रात्री त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची आरटी पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
बोर्डाच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की त्याला वुडलँड्स नर्सिंग होममध्ये नेण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत, योग्य औषधं दिली गेली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला गांगुलीला दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराच्या समस्येनंतर त्याची इमर्जन्सी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.