NZ vs SL: फ्लाईंग स्मिथ.. बाऊंड्री लाईनवर हवेत डाईव्ह मारत घेतला मलिंगाचा कॅच; पाहा VIDEO

Nathan Smith Catch Video: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात नॅथन स्मिथने हवेत डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
NZ vs SL: फ्लाईंग स्मिथ.. बाऊंड्री लाईनवर हवेत डाईव्ह मारत घेतला मलिंगाचा कॅच; पाहा VIDEO
viral catch videotwitter
Published On

आधी फिल्डींग म्हटलं की, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचं नाव आघाडीवर असायचं. मात्र आता न्यूझीलंडच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनाही मागे सोडलं आहे.

आधी ग्लेन फिलिप्सच्या अफलातून कॅचेसचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता न्यूझीलंडचा खेळाडू नॅथन स्मिथने बाउंड्री लाईनवर उघड्या डोळ्यांनी विश्वास बसणारच नाही, असा झेल टिपला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

NZ vs SL: फ्लाईंग स्मिथ.. बाऊंड्री लाईनवर हवेत डाईव्ह मारत घेतला मलिंगाचा कॅच; पाहा VIDEO
IND vs AUS, 2024-25: बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

श्रीलंकेचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरू आहे. दोन्ही संघांमधील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी पार पडला. या सामन्यात नॅथन स्मिथने बाऊंड्री लाईनवर धावत जाऊन भन्नाट झेल घेतला.

तर झाले असे की, श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. प्रथम फलंदाजी करताना २९ वे षटक टाकण्यासाठी विल ओ रुडकी गोलंदाजी करण्यासाठी आला. या षटकातील शेवटचा चेंडू त्याने शॉर्ट लेंथवर टाकला.

NZ vs SL: फ्लाईंग स्मिथ.. बाऊंड्री लाईनवर हवेत डाईव्ह मारत घेतला मलिंगाचा कॅच; पाहा VIDEO
Virat Kohli,IND vs AUS: कोहलीच्या फॉर्मची कसोटी! 14 वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियात असं घडलं

या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या मलिंगाने लाँग ऑफच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची कडा घेत थर्ड मॅनच्या हातात गेला. त्यावेळी स्मिथ थर्ड मॅनला फिल्डिंग करत होता. तो धावत गेला आणि त्याने हवेत डाईव्ह मारत अविश्वसनीय झेल घेतला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

नॅथन स्मिथने घेतलेल्या या झेलची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ न्यूझीलंड क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका युझरने कमेंट करत लिहिले की, ' न्यूझीलंडला उडायचं कसं हे चांगलच माहीत आहे. कॅचेस तुम्हाला सामने जिंकून देतात..' तर आणखी एका युजरने लिहिले की, ' न्यूझीलंडची फिल्डींग ही जगात भारी आहे..' हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड शेअर केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com