NZ vs PAK: 6,6,6,6..आफ्रिदीला धू धू धुतलं..किवी फलंदाजाची फटकेबाजी अन् शाहीनच्या नावे लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

Shaheen Afridi: पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेचा थरार सुरु आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शाहीनची चांगलीच धुलाई झाली आहे.
NZ vs PAK: 6,6,6,6..आफ्रिदीला धू धू धुतलं..किवी फलंदाजाची फटकेबाजी अन् शाहीनच्या नावे लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद
shaheen afriditwitter
Published On

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची फ्लॉप कामगिरी सुरुच आहे. सुपरफ्लॉप कामगिरीमुळे त्याची वनडे संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर टी -२० संघात तो अजूनही कायम आहे.

मात्र इथूनही त्याची सुट्टी व्हायला फार वेळ लागणार नाही. कारण न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या टी-२० मालिकेत त्याची चांगलीच धुलाई झाल्याचे पाहायला मिळाले आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजाने त्याच्या एकाच षटकात ४ षटकार खेचले ,ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

NZ vs PAK: 6,6,6,6..आफ्रिदीला धू धू धुतलं..किवी फलंदाजाची फटकेबाजी अन् शाहीनच्या नावे लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद
IPL 2025: लखनऊची ताकद दुपटीने वाढणार! स्टार खेळाडू कमबॅकसाठी सज्ज

शाहीनच्या एकाच षटकात कुटल्या २६ धावा

या मालिकेतील पहिल्या मालिकेत आफ्रिदीने चांगली गोलंदाजी केली होती. त्याने या सामन्यात २ षटक गोलंदाजी करुन १७ धावा खर्च केल्या होत्या. मात्र दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याची चांगलीच धुलाई झाली आहे.

आफ्रिदीच्या दुसऱ्या सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने पहिलं षटक निर्धाव टाकलं. न्यूझीलंडचा फलंदाज टीम सिफर्ड त्याच्या गोलंदाजीवर १ धावही करु शकला नव्हता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात तो पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आला. यावेळीही गोलंदाज आफ्रिदी होता आणि फलंदाज टीम सेफर्ड.

NZ vs PAK: 6,6,6,6..आफ्रिदीला धू धू धुतलं..किवी फलंदाजाची फटकेबाजी अन् शाहीनच्या नावे लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद
IPL 2025: CSK ची खैर नाय..मुंबई इंडियन्स पहिल्याच सामन्यात तगड्या Playing XI सह उतरणार मैदानात

यावेळी सेफर्डने आफ्रीदीची पळता भूई थोडी केली. त्याने पहिल्या चेंडूवर समोरच्या दिशेने षटकार मारला. दुसऱ्या चेंडूवर कव्हरच्या वरुन षटकार खेचला. त्यानंतर षटकातील पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर आणखी २ गगनचुंबी षटकार मारले. या षटकात आफ्रीदीने २६ धावा खर्च केल्या.

यासह तो पाकिस्तानसाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात महागडं षटक टाकणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी पाकिस्तानचा गोलंदाज बिलावल भट्टीने ३० धावा खर्च केल्या होत्या. तर मोहम्मद समीने २८ धावा खर्च केल्या होत्या. तर हारीस रुउफने २८आणि आता आफ्रिदीने २६ धावा खर्च केल्या आहेत.

आफ्रिदीने टाकले कारकिर्दीतील सर्वात महागडे षटक

हे शाहीन आफ्रिदीच्या टी-२० कारकिर्दीतील सर्वात महागडे षटक ठरले आहे. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने २४ धावा खर्च केल्या होत्या. त्यावेळी फिन अॅलेनने २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २४ धावा चोपल्या होत्या. त्यापूर्वी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने एकाच षटकात २१ धावा खर्च केल्या होत्या. त्यावेळी मॅथ्यू वेडने एकाच षटकात ३ षटकार मारुन ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com