NZ vs PAK: न्यूझीलंडने ६० चेंडूत संपवला सामना! पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; 4-1 ने गमावली मालिका

New Zealand vs Pakistan Highlights: न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
NZ vs PAK: न्यूझीलंडने ६० चेंडूत संपवला सामना! पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; 4-1 ने गमावली मालिका
pak vs nztwitter
Published On

पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ५ टी-२० सामन्यांची मालिका पाकिस्तानने ४-१ ने गमावली आहे. पाकिस्तानला या मालिकेतील शेवटच्या सामन्यात ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात पाकिस्तानचा पहिल्या डावात फलंदाजीला आला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला १२९ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने अवघ्या १० षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं.

NZ vs PAK: न्यूझीलंडने ६० चेंडूत संपवला सामना! पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; 4-1 ने गमावली मालिका
IPL 2025 Live : श्रेयस 97 वर असताना शशांकने स्ट्राईक का दिली नाही? इनिंग संपल्यावर स्पष्टचं सांगितलं, शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडलं?

मालिकेतील पाचव्या सामन्यात न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी १२९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तुफान सुरुवात केली. इतक्या कमी आव्हानाचा पाठलाग करताना, सिफर्टने २५५.२६ च्या स्ट्राईक रेटने अवघ्या ३८ चेंडूत ९७ धावांची खेळी केली.

NZ vs PAK: न्यूझीलंडने ६० चेंडूत संपवला सामना! पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; 4-1 ने गमावली मालिका
IPL 2025 Points Table: गुणतालिकेत मोठी उलटफेर; लखनौचा धुव्वा उडवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची Points Tableमध्ये भरारी

या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ६ षटकार मारले. सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या सिफर्ट आणि एलेनने मिळून पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या वादळी फटकेबाजीमुळे न्यूझीलंडने १० षटकं शिल्लक ठेवून हा सामना आपल्या नावावर केला.

NZ vs PAK: न्यूझीलंडने ६० चेंडूत संपवला सामना! पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; 4-1 ने गमावली मालिका
IPL 2025: नवा कर्णधार, जुनी गोष्ट! पराभवानंतर ऋषभ पंतवर भर मैदानात संतापले संजीव गोएंका? Video झाला व्हायरल

पाकिस्तानी फलंदाजांचा फ्लॉप शो

पाकिस्तानने या सामन्यासाठी आपल्या संघात ५ मोठे बदल केले होते. पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला होता. या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानी फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला.

पाकिस्तानकडून सलामीला फलंदाजीला आलेला हसन नवाज पुन्हा एकदा शून्यावर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर विकेट्सची रांगच लागली. या सामन्यातही कर्णधार सलमान आगाने संघाचा भार आपल्या खांद्यावर घेतला. त्याने या डावातील सर्वाधिक खेळी करताना ३९ चेंडूंचा सामना करत ५१ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com