
NZ vs IND, 3rd T20 Weather Update : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी २० सामना पावसामुळं रद्द करावा लागला होता. आता तिसऱ्या टी २० सामन्यावरही पावसाचं सावट आहे. हवामानाचा अंदाज बघता तिसऱ्या सामन्यातही पावसाचाच खेळ होऊ शकतो. नेपियरमध्ये हा सामना होत आहे. मात्र, पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी वेलिंग्टनमधील पहिला टी २० सामना पावसामुळं रद्द करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला होता.
भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. टी २० आणि वनडे मालिका होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी २० मालिकेने झाली आहे. या मालिकेतील दोन सामने झाले आहेत. पहिला सामना रद्द झाला, तर दुसऱ्या सामन्यात भारतानं विजय मिळवला. तिसरा सामना आज, मंगळवारी होणार आहे. सध्या भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. जर आजचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही तर भारत मालिका जिंकू शकतो. (Cricket News)
पावसाचा अंदाज
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी २० सामना व्हावा अशी प्रत्येक क्रिकेट चाहत्याची इच्छा असेल. पण नेपियरमधील हवामान उत्तम असायला हवा. वेदर डॉट कॉमच्या माहितीनुसार, नेपियरमध्ये २२ नोव्हेंबरला दुपारी पावसाचा अंदाज आहे. पावसाची शक्यता ५९ टक्के आहे. संध्याकाळच्या सुमारास ही शक्यता आणखी वाढणार आहे. कारण पावसाची शक्यता ६४ टक्के व्यक्त करण्यात आली आहे. जसजशी संध्याकाळी होईल तशी पावसाची शक्यता कमी होईल. पण वातावरण ढगाळ राहील, असा अंदाज आहे. (Sports News)
पावसाचं सावट कायम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी २० सामन्यावर पावसाचं सावट कायम राहील. पावसामुळं सामना उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच षटके खेळायला हवीत. सध्याचा हवामानाचा अंदाज बघता मिनी मॅच होण्याची दाट शक्यता आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.