No Ball Rule: विकेटकीपरच्या या चुकीमुळेही दिला जातो नो बॉल! क्रिकेटचा हा नियम अनेकांना माहितच नसेल

Rare No Ball In Cricket: क्रिकेटमध्ये गोलंदाजाच्या चुकीमुळे नो बॉल दिला जातो, मात्र यष्टीरक्षकाच्या चुकीमुळेही नो बॉल दिला जातो, हे अनेकांना माहितच नसेल,.
No Ball Rule: विकेटकीपरच्या या चुकीमुळेही दिला जातो नो बॉल! क्रिकेटचा हा नियम अनेकांना माहितच नसेल
no balltwitter
Published On

क्रिकेटमध्ये असंख्य नियम आहेत, जे अनेकांना माहितच नाहीये. क्रिकेटमध्ये नो बॉल अनेकदा गोलंदाज कारणीभूत असतात. गोलंदाजी करताना पाय पुढे गेला की नो, चेंडू कंबरेच्या वर फेकला तरी नो. मात्र एक असा नियमही आहे, जो यष्टीरक्षकाशी संबधित आहे. यष्टीरक्षकाच्या चुकीमुळेही नो बॉल दिला जाऊ शकतो. काय आहे हा नियम? जाणून घ्या.

इंग्लंडमध्ये वायटॅलीटी ब्लास्ट २०२४ स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत यष्टीरकक्षकाच्या चुकीमुळे नो चेंडू देण्यात आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तर झाले असे की, ५ सप्टेंबर रोजी समरसेट आणि नॉर्थम्टरशायर हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.

या सामन्यात समरसेट संघाने १७ धावांनी विजय मिळवला. नॉर्थम्टरशायर संघाच्या पराभवाला यष्टीरक्षक कारणीभूत ठरला आहे. या सामन्यात नॉर्थम्टरशायर संघाचा यष्टीरक्षक लेविस मॅकमॅनसने एक चूक केली, ज्यामुळे टॉम कोरल कॅडमोरला जीवदान मिळालं आणि नो बॉल मिळाल्याने सामनाही हातून निसटला.

No Ball Rule: विकेटकीपरच्या या चुकीमुळेही दिला जातो नो बॉल! क्रिकेटचा हा नियम अनेकांना माहितच नसेल
Musheer Khan ने मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा महारेकॉर्ड! इतिहास रचण्यासाठी इतक्या धावांची गरज

नॉर्थम्टरशायर संघाची गोलंदाजी सुरु असताना, १४ वे षटक टाकण्यासाठी सेफ जेब गोलंदाजीला आला होता. या षटकात त्याने टॉम बेंटनची विकेट काढली. तो ४३ चेंडूंचा सामना करत ७५ धावांवर फलंदाजी करत होता. त्यानंतर कोलर फलंदाजी करत असताना, स्टीम्पिंगची जोरदार अपील झाली. हा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

No Ball Rule: विकेटकीपरच्या या चुकीमुळेही दिला जातो नो बॉल! क्रिकेटचा हा नियम अनेकांना माहितच नसेल
Musheer Khan: मुशीरचा डबल धमाका! मास्टर ब्लास्टरचा रेकॉर्ड मोडला; मोठ्या रेकॉर्डमध्ये राहुल- अय्यरलाही सोडलं मागे

तिसऱ्या अंपायरने पाहिलं, तेव्हा यष्टीरक्षकाने चेंडू यष्टीच्या पुढे पकडल्याचं दिसून आलं. नियमानुसार, यष्टीरक्षण करताना चेंडू हा यष्टीच्या मागेच पकडला गेला पाहिजे. जर ग्लोव्ह्ज किंवा शरीराचा कुठलाही भाग यष्टीच्या पुढे असेल, तर अंपायर नो बॉल देतात. त्यामुळे फलंदाज नॉट आऊट राहिला आणि फ्री हिटवर फलंदाजाने षटकार खेचला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com