Musheer Khan ने मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा महारेकॉर्ड! इतिहास रचण्यासाठी इतक्या धावांची गरज

Musheer Khan Breaks Sachin Tendulkar Record: मुंबईचा स्टार खेळाडू मुशीर खानने दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दीड शतकी खेळी केली आहे.
Musheer Khan ने मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा महारेकॉर्ड! इतिहास रचण्यासाठी इतक्या धावांची गरज
musheer khantwitter
Published On

भारताचा युवा स्टार फलंदाज मुशीर खानने अनुभवी गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला आहे. देशांतर्गत स्पर्धेतील प्रसिद्ध स्पर्धा दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत इंडिया ए विरुद्ध इंडिया बी विरुद्ध या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या सामन्यात मुशीर खानने शानदार खेळी केली आहे.

मुशीरने मोडला सचिनचा रेकॉर्ड

मुशीर खान अभिमन्यू इश्वरनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंडिया बी संघाकडून खेळतोय. या संघाकडून खेळताना त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. ज्या खेळपट्टीवर संघातील प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतले. त्याच खेळपट्टीवर मुशीर खानने इंडिया ए संघातील गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले.

पहिल्याच दिवशी शतक आणि दुसऱ्या दिवशी त्याने आपलं दीड शतक पूर्ण केलं आहे. त्याने नवदीप सैनीसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर इंडिया बी संघाची धावसंख्या ३०० धावांच्या जवळपास जाऊन पोहोचली आहे.

मुशीर खानने सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. सचिन तेंडुलकरने दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पदार्पणात १५९ धावांची खेळी केली होती. मुशीरने या रेकॉर्डमध्ये सचिनला मागे सोडलं आहे. या यादीत बाबा अपरजीत अव्वल स्थानी आहे. त्याने २१२ धावांची खेळी केली होती. तर यश धुलने १९३ धावांची खेळी केली होती.

Musheer Khan ने मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा महारेकॉर्ड! इतिहास रचण्यासाठी इतक्या धावांची गरज
Musheer Khan: मुशीरचा डबल धमाका! मास्टर ब्लास्टरचा रेकॉर्ड मोडला; मोठ्या रेकॉर्डमध्ये राहुल- अय्यरलाही सोडलं मागे

अला राहिलाय रेकॉर्ड

मुशीर खानने आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत आपली छाप सोडली होती. या स्पर्धेत खेळताना त्याने ३०० धावांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. मुख्य बाब म्हणजे देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याला अवघे ७ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.

यादरम्यान त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये दुहेरी शतकी खेळी केली होती. तर सेमीफायनलच्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर फायनलमध्ये त्याने शतक आणि आता दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पदार्णपणाच्या सामन्यात त्याने दीड शतक झळकावलं आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या इंडिया बी संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. अवघ्या ३३ धावांवर या संघाला पहिला धक्का बसला.

त्यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाज आले आणि गेले. मात्र मुशीर खान टीकून राहिला. त्याने इंडिया ए च्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. एक वेळ अशी होती जेव्हा इंडिया बी संघाची धावसंख्या ७ गडी बाद ९४ धावा इतकी होती. मात्र त्यानंतर त्याने १५० धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ३०० वर पोहोचवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com