नवी दिल्ली : मागील वर्षी टोक्यो ऑलम्पिकमध्ये भारताला नीरज चोप्राने (Neeraj Chopra) गोल्ड मेडल मिळवून दिले होते. १० महिन्यांपूर्वी इतिहास रचलेल्या निरजने आता पुन्हा एक इतिहास रचला आहे. फिनलॅण्डमधील पावो नूरमी गेम्समध्ये पुन्हा भारताचे नाव मोठे केले आहे. निरजने भलेही गोल्ड मेडल जिंकले नसेल, पण त्याने ८९.३० मीटर दूर भालाफेक करत नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात त्याने पतियालामध्ये ८८.०७ मीटर दूर भाला फेकला होता. ७ ऑगस्ट २०२१ रोजी त्याने टोक्यो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावले होते.
या कामगिरीमुळे नीरज हा अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक पटकावणारा पहिला खेळाडू ठरलेला. निरज दहा महिन्यानंतर आला आणि पुन्हा इतिहास रचत विक्रम बनवला आहे. टोक्यो ऑलम्पिकमध्ये मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्राचे (Neeraj Chopra) देशभर कौतुक करण्यात आले होते. २४ वर्षाच्या निरजने मिळवलेल्या या यशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
फिनलॅण्डच्या ऑलिव्हर हीलॅण्डरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्याने ८९.८३ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. नीरजच्या कामगिरीशी तुलना केल्यास सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेल्या ऑलिव्हरने ०.५३ मीटरच्या अंतराच्या फरकाने पहिला क्रमांक पटकावला आहे. हा विजय निरजच्या हातून निसटता काही पॉइंट्सने गेला आहे, पण त्याने यात आपलाच रेकॉर्ड मोडला आहे.
टोक्यो ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा (Neeraj Chopra) १० महिने ग्राउंडपासून बाजूला होता. टोक्योच्या विजयाचे देशभर कौतुक झाले. त्याला देशभर बोलवण्यात आले होते. या यशानंतर त्याला सरकारी आणि खासगी अनेक जाहीरातींमध्ये संधी मिळाली आहे. त्यामुळे तो मैदानापासून १० महिने बाहेर होता. १० महिन्यानंतर पुन्हा त्याने मैदानात चांगली कामगिरी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.