मुंबई: गेल्या काही दिवसापासून सोन्या(Gold) , चांदीचे दरात मोठी वाढ झाल्याचे दिसत होते. रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय सराफ बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले होते. ऐन लग्न सराईमध्ये दागिन्यांचे दर वाढल्यामुळे अनेकांच्या खिशाला कात्री बसली होती, आता पुन्हा सोने खरेदी करणाऱ्यांसाठी गोड बातमी समोर आली आहे. सोन्या (Gold Rates), चांदीचे दर पुन्हा उतरले आहेत. भारतीय सराफ बाजारात बुधवारचे दर जाहीर झाले आहेत.(Gold-Silver Price Latest News)
सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. ९९९ शुद्धतेचे दहा ग्रॅम सोन्याचा दर ५०६१९ रुपयांवर गेला आहे. तर एक किलो चांदी ६०१९३ रुपयांवर गेला आहे. चांदीने पुन्हा एकदा प्रतिकिलो ६०,००० रुपयांचा टप्पा पार केला आहे. (Gold-Silver Price Today)
सोन्या-चांदीचे (Gold)दर दिवसातून दोनवेळा जारी केले जातात. सकाळी एकदा आणि दुसऱ्यांदा सायंकाळी जाहीर केले जातात. ९९५ शुद्धतेचे सोने (Gold) आज ५०४१६ रुपयांवर पोहचली जात आहे. ९१६ शुद्धतेच्या सोन्याचा भाव ४६३६७ रुपयांवर गेला आहे. ७५० शुद्धतेचे सोने ३७९६४ रुपये झाले आहे, तर ५८५ शुद्धतेचे सोने २९६१२ रुपयांवर गेले आहे. तर ९९९ शुद्धतेची एक किलो चांदीचे दर ६०१९३ रुपयांवर गेले आहे. (Gold-Silver Price Latest News)
एकीकडे सोने (Gold) स्वस्त झाले असतानाच चांदीचे दर मात्र वाढले आहेत. ९९९ आणि ९९५ शुद्धतेचे सोने आज २८ रुपयांनी स्वस्त झाले आहे. ९१६ शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याच्या दरात २६ रुपयांची घट झाली आहे. याशिवाय ७५० शुद्धतेच्या सोन्याचा भाव २१ रुपयांनी तर ५८५ शुद्धतेच्या सोन्याचा भाव १६ रुपयांनी कमी झाला आहे. आज एक किलो चांदीच्या दरात २२७ रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold-Silver Price Today)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.