Chess Tournament: नागपूरच्या दिव्या देशमुखची 'सुवर्ण'भरारी! जागतिक ज्युनियर चेस चॅम्पियनशिप'मध्ये जेतेपदावर कोरलं नाव

World Junior Chess Championship, Divya Deshnukh: भारताची बुद्धिबळपटू आणि आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर दिव्या देशमुख ने 'जागतिक ज्युनियर चेस चॅम्पियनशिप' मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
Chess Tournament: नागपूरच्या दिव्या देशमुखची 'सुवर्ण'भरारी! जागतिक ज्युनियर चेस चॅम्पियनशिप'मध्ये जेतेपदावर कोरलं नाव
divya deshmukhsaam tv news
Published On

भारताची बुद्धिबळपटू आणि आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने 'जागतिक ज्युनियर चेस चॅम्पियनशिप' मध्ये सुवर्णपदक पटकावण्याचा कारनामा करुन दाखवला आहे. नागपूरच्या १८ वर्षीय दिव्याने ११ व्या फेरीत १० गुणांची कमाई केली. तिने ११ पैकी ९ सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर २ सामने ड्रॉ राहिले. ११ व्या फेरीत तिने बुल्गारियाच्या बेलोस्लावा क्रास्तेवाला पराभूत केलं. या स्पर्धेचे आयोजन गुजरातच्या गांधीनगर येथे केले गेले होते.

दिव्या देशमुखने यापूर्वी आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं आहे. तिने सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान पटकावला आहे. यापूर्वी तिने शारजहा चॅलेंजर्सचा खिताब पटकावला होता. आर्मेनियाची मरियम मकर्चयन ९.५ गुणांसह या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. तर अजरबैजानची अयान अल्लहवारदिएवा ८.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. तिने १० व्या फेरीत आपली सहखेळाडू साची जैनला एकतर्फी पराभूत करत जेतेपदाच्या दिशेने वाटचाल आणखी मजबूत केली.

Chess Tournament: नागपूरच्या दिव्या देशमुखची 'सुवर्ण'भरारी! जागतिक ज्युनियर चेस चॅम्पियनशिप'मध्ये जेतेपदावर कोरलं नाव
IND vs USA: टीम इंडियाला एक्स्ट्रा ५ धावा का मिळाल्या? अमेरिकेला ही एक चूक महागात पडली

अंडर १९ राष्ट्रीय चॅम्पियन आणि फिडे मास्टर १४ वर्षीय शुभी गुप्ताने शानदार खेळ करत सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. भारताची रक्षिता रवी ७.५ गुणांसह या स्पर्धेत पाचव्या स्थानावर राहिली. दिव्या देशमुख ही नागपूरची असून तीने 2023 मध्ये 'इंटरनॅशनल मास्टर' आणि 2021 मध्ये 'महिला ग्रँडमास्टर' टायटल जिंकले आहे.

Chess Tournament: नागपूरच्या दिव्या देशमुखची 'सुवर्ण'भरारी! जागतिक ज्युनियर चेस चॅम्पियनशिप'मध्ये जेतेपदावर कोरलं नाव
Team India News: सुपर ८ आधीच टीम इंडियाचे २ स्टार खेळाडू मायदेशी परतणार! मोठं कारण आलं समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com