Gautam Gambhir Statement: 'धोनीने देशासाठी आणि संघासाठी नंबर ३ चा त्याग केला..',गंभीरचा रोख नेमका कुणाकडे?

Gautam Gambhir Latest News: भारत- श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यानंतर गौतम गंभीर एमएस धोनीचं कौतुक करताना दिसून आला आहे.
Ms dhoni sacrificed his number 3 position and runs for team india says gautam gambhir
Ms dhoni sacrificed his number 3 position and runs for team india says gautam gambhir Saam tv news

Gautam Gambhir On MS Dhoni:

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने २००७ टी-२० वर्ल्डकप, २०११ वनडे वर्ल्डकप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद जिंकून दिलं आहे. दरम्यान आता माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर एमएस धोनीचं कौतुक करताना दिसून आला आहे.

Ms dhoni sacrificed his number 3 position and runs for team india says gautam gambhir
World Cup 2023: आशिया कप जिंकला, पण वर्ल्डकप तोंडावर असताना प्रमुख खेळाडूनं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन!

गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले की, ' जर एमएस धोनी कर्णधार नसता तर तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला असता आणि धावांचा पाऊस पाडला असता. त्याने भारतीय संघासाठी आणि भारतीय संघाला ट्रॉफी जिंकून देण्यासाठी आपल्या धावांचा त्याग केला.' भारतीय संघाचा जर रेकॉर्ड पाहिला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ असे १५ फलंदाज आहेत ज्यांनी वनडेत १० हजार धावांचा पल्ला गाठला आहे. हे सर्व फलंदाज टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करणारे आहेत. (Latest sports updates)

एमएस धोनीच्या नावे आहे या विक्रमाची नोंद..

एमएस धोनी वनडे क्रिकेटमध्ये मिडल ऑर्डर किंवा लोअर मिडल ऑर्डरला फलंदाजी करण्यासाठी यायचा. कारकिर्दीच्या सुरूवातीला तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. त्यानंतर तो पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा.

गंभीरने भाष्य केल्यानंतर पून्हा एकदा चर्चेला सुरूवात झाली आहे. मात्र गौतम गंभीरचा रोख कोणाकडे होता हे कळू शकलेलं नाही.

Ms dhoni sacrificed his number 3 position and runs for team india says gautam gambhir
ICC ODI Rankings: वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! मालिका गमावताच मिळाली वाईट बातमी

एमएस धोनीची कारकिर्द..

एमएस धोनीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ३५० वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यादरम्यान त्याने १०७७३ धावा केल्या आहेत. ज्यात १० शतके तर ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ९० कसोटी सामन्यांमध्ये त्याने ४८७६ आणि ९८ टी-२० सामन्यांमध्ये १२८२ धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com