चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आपला शेवटचा आयपीएल हंगाम खेळत असल्याची चर्चा सुरू आहे. कारण स्पर्धेच्या सुरुवातीलाच त्याने कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडवर सोपवली. त्यामुळे आपल्या खेळाडूला खेळताना पाहण्यासाठी फॅन्स हजारोंच्या संख्येने हजेरी लावत आहेत. अहमदाबादच्या मैदानावर झालेल्या सामन्यातही लाखो प्रेक्षकांनी एमएस धोनीची एक झलक पाहण्यासाठी हजेरी लावली. दरम्यान एका चाहत्याने थेट मैदानात प्रवेश केला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
तर झाले असे की, गुजरात टायटन्सने दिलेल्या २३२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईला सुरुवातीचे धक्के बसले. मात्र तरीही मिचेल आणि मोईन अलीने मिळून संघाला मजबूत स्थितीत पोहचवलं होतं. चेन्नईचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र एका बाजूने विकेट्स जात होते. शेवटी एमएस धोनी फलंदाजी करण्यासाठी आला. त्यावेळी चेंडू कमी आणि धावा जास्त होता. सामना चेन्नईच्या हातून निसटलाच होता. शेवटी धोनीने चौफेर फटकेबाजी केली.
शेवटचे षटक टाकण्यासाठी राशिद खान गोलंदाजाला गोलंदाजीला आला होता. या षटकातील सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवर एमएस धोनीने षटकार मारले. त्यानंतर तिसरा चेंडू धोनीच्या पॅडला जाऊन लागला. त्यावेळी अंपायरने नॉट आऊट दिलं. मात्र डीआरएसची मागणी करण्यात आली. तिसरे अंपायर आपला निर्णय देत असताना धोनीच्या फॅनने सुरक्षा रक्षकांना चकवा देत मैदानात एन्ट्री केली.
मुख्य बाब म्हणजे धोनीनेही त्याला येऊ दिलं. फॅन आल्यानंतर तो धोनीच्या पाया पडला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. फॅन्सने सुरक्षा रक्षकांना चकवा देत मैदानात येण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. अनेकदा खेळाडूंच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.