
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराजयर्स हैदराबाद हा सामना सुरु झाला आहे. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता सनरायजर्स हैदराबादचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. वानखेडेवर विजय पुन्हा विजय मिळवण्यासाठी मुंबई सज्ज झाली आहे.
मुंबई आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी आयपीएल २०२५ मध्ये ६ सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी ४ सामने गमावले आहेत आणि २ सामन्यांमध्ये त्यांना विजय प्राप्त झाला आहे. तरीही पॉईंट्स टेबलवर मुंबई इंडियन्स सातव्या स्थानी आहे, तर सनरायजर्स हैदराबाद नवव्या स्थानी आहे. पॉईंट्स टेबलवर झेप घेण्यासाठी आजचा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी आवश्यक आहे.
टॉस जिंकल्यानंतर हार्दिकने हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधला. 'वानखेडे स्टेडियमवर काल सरावादरम्यान दव पडली होती. वानखेडेवर ड्यू असेल तर दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजीला फायदा होईल' असे हार्दिक पंड्या म्हणाला. 'मागच्या सामन्यातील विजयाने संघातील सर्वांचा उत्साह वाढला आहे. इन-फॉर्म खेळाडूंना वरच्या क्रमावर पाठवले जाईल की नाही हे आम्ही परिस्थितीनुसार ठरवू', असे वक्तव्य हार्दिक पंड्याने केले आहे.
डेल स्टेनने काही दिवसांपूर्वी एक भविष्यवाणी केली होती. यात त्याने आजच्या मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यात ३०० धावा पाहायला मिळतील असे म्हटले होते. आज हार्दिकने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आहे. त्याने हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली आहे. त्याच्या या निर्णयामुळे ३०० पारची भविष्यवाणी खरी ठरतेय की काय अशी भीती चाहत्यांना आहे.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -
रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा.
सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग ११ -
अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), मोहम्मद शमी, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, झीशान अन्सारी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.