MI vs LSG Match Result: लखनऊचा थरारक विजय; मुंबई प्ले ऑफमधून बाहेर होणार? कसे असेल समीकरण?

MI vs LSG Match Result: शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात लखनऊ मुंबईवर ५ धावांनी थरारक विजय मिळवला.
MI vs LSG Match Result
MI vs LSG Match ResultSaam TV

MI vs LSG Match Result: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघात अतिशय रंगदार सामना झाला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात लखनऊ मुंबईवर ५ धावांनी थरारक विजय मिळवला. या विजयासह लखनऊने प्लेऑफच्या फेरीत आपली दावेवारी कायम ठेवली. तर मुंबईचं प्लेऑफची फेरी गाठण्याचा मार्ग अधिकच खडतर झाला आहे.  (Latest sports updates)

मोसिन खान हा लखनऊच्या विजयाचा हिरो ठरला. शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी ११ धावांची गरज असताना मोसिन खानने जबरदस्त गोलंदाजी करत फक्त ५ धावा खर्च केल्या. प्रथम फलंदाजी करताना लखनौने मुंबईसमोर विजयासाठी १७८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना  मुंबई इंडियन्सची सुरूवात अतिशय दमदार झाली होती.

MI vs LSG Match Result
Arjun Tendulkar IPL 2023: अर्जुनचं मुंबई संघात कमबॅक करणं कठीण! रोहित 'या' कारणामुळे ठेवतोय संघाबाहेर

सलामीवर रोहित शर्मा आणि इशान किशनने पावरप्लेमध्ये लखनौच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं. दोघांनी मिळून पहिल्या विकेट्साठी ९.४ षटकात ९० धावांची भागीदारी केली. मात्र, फिरकीपटू रवी विश्नोईने आधी रोहित शर्मा आणि त्यानंतर इशान किशनला बाद करत ही जोडी फोडली.

रोहितने २५ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. तर इशान किशनने ३९ चेंडूत ५९ धावा कुटल्या. दोघेही बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव घसरला. (Cricket News) सूर्यकुमार यादव यश धुलला मोठा फटका मारण्याच्या नादात ७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मोसिन खानने नेहाल वडेरालाही बाद केलं. वडेरा १६ धावा काढून बाद झाला.

एकापाठोपाठ एक ४ झटके बसल्यानंतर टीम डेव्हिड हा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. त्याने जबरदस्त फटकेबाजी करत मुंबईला विजयाजवळ नेलं. शेवटच्या षटकात मुंबईला केवळ ११ धावांची गरज होती. यावेळी कृणाल पांड्याने मोसिन खानकडे चेंडू सोपावला.

मोसिन खानने टीम डेव्हिड आणि कॅमरून ग्रीनच्या समोर शानदार षटक टाकलं. मोसिनच्या या षटकात डेव्हिड आणि ग्रीनला एकही मोठा फटका मारता आला नाही. परिणामी लखनौने हा सामना ५ धावांनी आपल्या खिशात घातला. मुंबईकडून (Sport Updates) डेव्हिडने झुंजार खेळी केली. त्याने १९ चेंडूत ३२ धावा कुटल्या. लखनौकडून रवि बिश्नोई आणि यश ठाकूने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. याशिवाय मोसिन खानने एक विकेट्स घेतली.

तत्पुर्वी लखनऊने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर विजयासाठी १७८ धावांचं लक्ष ठेवलं होतं. लखनऊची सुरूवात अत्यंत खराब झाली होती. मात्र, मार्कस स्टॉयनिस आणि कृणाल पांड्याने जबरदस्त खेळी केली. स्टॉयनिसने ४७ चेंडूत ८९ धावा कुटल्या. या खेळीत त्याने ८ षटकार आणि ४ चौकार लगावले. तर कृणाल पांड्याने ४२ चेंडूत नाबाद ४९ धावांची खेळी केली. मुंबईकडून जेसन बेहरनड्रॉफने २ विकेट्स आणि पियूष चावलाने १ विकेट्स घेतली.

दरम्यान, या पराभवासह मुंबईचा प्लेऑफची फेरी गाठण्याचा मार्ग अधिकच कठीण झाला आहे. मुंबईचे सध्या १४ गुण असून त्यांचा एकच सामना बाकी आहे. हा सामना हैदराबादविरोधात होणार असून यात जर मुंबईने विजय मिळवला तर ते १६ गुणावर पोहचतील. पण तरीही मुंबईला प्लेऑफची फेरी गाठण्यासाठी इतर संघावर अवलंबून राहावं लागणार आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com