
MI VS LSG : वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये मुंबईने ५४ धावांनी लखनऊचा पराभव केला आहे. हा मुंबईचा सलग पाचवा विजय आहे, तर लखनऊचा सलग दुसरा पराजय आहे. या विजयानंतर पॉईंट्स टेबलवर मुंबईला दुसरे स्थान मिळाले आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मुंबईच्या खेळाडूंनी प्रथम फलंदाजी करत २० ओव्हर्समध्ये २१५ धावा केल्या. २१६ धावांचे लक्ष गाठताना लखनऊने फक्त १६१ धावा केल्या. हा लखनऊचा सलग दुसरा पराभव आहे. २२ एप्रिल रोजी दिल्लीने लखनऊला एकाना स्टेडियमवर पराभूत केले होते.
मुंबईकडून फलंदाजीमध्ये रायन रिकेल्टन आणि सूर्यकुमार यादव यांनी दोघांनी अर्धशतकीय खेळी केली. या व्यतिरिक्त विल जॅक्सने २९ धावा, नमन धीरने नाबाद २५ धावा आणि कॉर्बिन बॉशने २० धावा केल्या. दुसऱ्या बाजूला, लखनऊकडून मयंक यादव आणि आवेश खान यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावामध्ये लखनऊचे फलंदाज २१६ धावांचे लक्ष गाठण्यासाठी मैदानामध्ये उतरले. बुमराहने एडन मार्करामला ९ धावांवर बाद केले. विल जॅक्सच्या ओव्हरमध्ये निकोलस पूरन (२७ धावा) आणि रिषभ पंत (४ धावा) या दोन विकेट्स पडल्या. ट्रेंट बोल्डेने आक्रमक मिचेल मार्शला ३४ धावांवर रोखले. आयुष बडोनी ३५ धावा आणि डेव्हिड मिलर २४ धावांवर बाद झाले. त्यानंतर लखनऊच्या हातून सामना गेला. जसप्रीत बुमराहने ४ विकेट्स, ट्रेंट बोल्ट ३ विकेट्स आणि विल जॅक्स २ विकेट्स घेतल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.