
पंजाब किंग्सच्या संघाने तुफानी शैलीत फलंदाजी करत सामना जिंकला. लखनऊच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. लखनऊच्या संघाला त्यांच्याच घरच्या मैदानात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. लखनऊ संघाने पंजाबसमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पंजाबच्या संघाने हे आव्हान शानदार फलंदाजी करत १६ व्या षटकात पार केलं.
आयपीएल २०२५ चा १३ वा सामना आज लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. पंजाबने आयपीएल २०२५मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयासह पंजाबचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. पहिल्या क्रमांकावर बेंगळुरू तर तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स आहे. पंजाब, बेंगळुरू आणि दिल्लीच्या संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाहीये.
पंजाब किंग्सचीही सुरुवात खराब झाली. प्रियांश आर्य केवळ ८ धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरने आक्रमक फलंदाजी करत लखनऊचा पराभव केला. या दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. प्रभासिमरनने २४ चेंडूत अर्धशतक केलं. त्याने ३४ चेंडूत ६९ धावा केल्या. लखनऊने दिलेल्या १७२ धावांचे आव्हान पंजाब किग्सने १६ षटकात ८ विकेट राखत पूर्ण केलं.
पंजाबने लखनऊ लक्ष्य २२ चेंडू शिल्लक असताना पूर्ण केलं. पंजाबच्या संघाकडून फंलदाजी करताना प्रभसिमरन सिंगने ३४ चेंडूत ६९ धावांची शानदार खेळी केली. यात ३ षटकार आणि ९ चौकाराचा समावेश आहे. तर कर्णधार श्रेयस अय्यरने ३० चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या. यात ४ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश आहे. पंजाबच्या विजयात इम्पॅट प्लेअर नेहल वढेराचं मोठं योगदान आहे. त्याने २५ चेंडूत ४३ धावा केल्या. यात ४ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश आहे.
पंजाब किंग्सचा गोलंदाज अर्शदीप सिंगने गोलंदाजीत आपले कौशल्य दाखवले. या डावखुऱ्या गोलंदाजाने ४ षटकात ४३ धावा देत ३ बळी घेतले. त्याच्याशिवाय लॉकी फर्ग्युसनने २६ धावांत एक विकेट घेतली. मॅक्सवेलने २२ धावा देत एक विकेट घेतली. मार्को यान्सनने ४ षटकात २८ धावा देत एक विकेट घेतली. चहलनेही एक विकेट घेतली.
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रेयसचा हा निर्णय योग्य ठरवत गोलंदाजांनी लखनौला सुरुवातीला धक्के दिले. लखनौने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. लखनौसाठी निकोलस पूरनने ३० चेंडूत ४४ धावा केल्या तर आयुष बदोनीने ३३ चेंडूत ४१ धावा केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.