Lok Sabha election 2024: अजिंक्य रहाणेने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना केलं मोठं आवाहन

Ajinkya Rahane, Lok Sabha election 2024: भारताचा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने मतदानाचा हक्क बजावला आहे.
Lok Sabha election 2024: अजिंक्य रहाणेने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना केलं मोठं आवाहन
lok sabha election 2024 phase indian cricketer ajinkya rahane casted vote with her wife saam tv news
Published On

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज (२० मे) मतदान सुरु आहे. ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, वायव्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभेच्या जागांसाठी मतदान सुरु आहे. हे लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान आहे.

मतदान करण्यासाठी सामान्य जनतेसह सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकताच भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य रहाणेने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. ipl

Lok Sabha election 2024: अजिंक्य रहाणेने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना केलं मोठं आवाहन
KKR vs RR, IPL 2024: राजस्थान रॉयल्सचं नशीबच फुटकं! पावसामुळे झालं मोठं नुकसान

नुकताच आयपीएल २०२४ स्पर्धा खेळून आलेल्या अजिंक्य रहाणेने आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यासह त्याने सोशल मीडिया पोस्ट करत मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाचं प्रतिनिधित्व केलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दरम्यान घरी परतताच त्याने मतदान करण्यासाठी हजेरी लावली आहे.

Lok Sabha election 2024: अजिंक्य रहाणेने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना केलं मोठं आवाहन
IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेसह या दिग्गज खेळाडूंची कारकिर्द संपली?

रहाणेने आपल्या पत्तीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ते दोघेही बोटावरील शाही दाखवताना दिसून येत आहेत. या फोटोवर त्याने कॅप्शन म्हणून, 'आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं, तुम्ही पार पाडलं का?..' असं लिहिलं आहे.

Lok Sabha election 2024: अजिंक्य रहाणेने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना केलं मोठं आवाहन
KKR vs RR, IPL 2024: राजस्थान रॉयल्सचं नशीबच फुटकं! पावसामुळे झालं मोठं नुकसान

अजिंक्य रहाणेचा आयपीएल २०२४ स्पर्धेत फ्लॉप शो

चेन्नई सुपर किंग्ज संघाचं प्रतिनिधित्व करताना अजिंक्य रहाणेला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने १३ सामन्यांमध्ये २०.१७ च्या सरासरीने आणि १२३.४७ च्या स्ट्राईक रेटने २४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला एकही शतक किंवा अर्धशतक झळकावता आलेलं नाही. या हंगामात ४५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. तसेच त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १८५ सामने खेळले आहेत. यादरम्यान १७१ डावात त्याने ३०.१४ च्या सरासरीने ४६४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला २ शतक आणि ३० अर्धशतकं झळकावता आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com