LLC Auction 2024: क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज! ख्रिस गेल गुजरातकडून खेळणार; शिखर धवनही मैदानात परतणार

Chris Gayle And Shikhar Dhawan In Legends League Auction: आगामी लेजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत ख्रिस गेल आणि शिखर धवन एकाच संघातून खेळताना दिसून येणार आहे.
LLC Auction 2024: ठरलं! ख्रिस गेल गुजरातकडून खेळणार! शिखर धवनही मैदानात परतणार
chris gayle shikhar dhawanyandex
Published On

भारताचा स्टार फलंदाज शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृ्त्ती घेऊन अवघे काही दिवस उलटले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला असला तरीदेखील तो लवकरच क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसणार आहे.

शिखर धवन लेजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. आगामी हंगामापूर्वी दिल्लीत या स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा पार पडला. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंवर मोठी बोली लागली.

LLC Auction 2024: ठरलं! ख्रिस गेल गुजरातकडून खेळणार! शिखर धवनही मैदानात परतणार
LLC 2023: हरभजनच्या टीमने जिंकली लिजेंड्स लीग २०२३ स्पर्धेची ट्रॉफी! रोमांचक सामन्यात अर्बनरायझर्स हैदराबादचा पराभव

लिलावात उतरण्यापूर्वीच शिखर धवनला गुजरात जायंट्सने आपल्या ताफ्यात स्थान दिलं. आगामी लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत तो ख्रिस गेलसोबत खेळताना दिसून येणार आहे. गेलचा देखील लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेच्या लिलावात ख्रिस गेलला गुजरात जायंट्सने आपल्या संघात स्थान दिलं असून, संघाचं कर्णधारपदही सोपवलं आहे.

LLC Auction 2024: ठरलं! ख्रिस गेल गुजरातकडून खेळणार! शिखर धवनही मैदानात परतणार
LLC 2023 Qualifier: अवघ्या २१ चेंडूत ठोकल्या ९८ धावा! ४० वर्षीय फलंदाजाचा कहर

ख्रिस गेलकडे संघाचं कर्णधारपद

गुजरात जायंट्सने लिजेंड्स लीग २०२४ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात एकूण ९ खेळाडूंवर बोली लावली. ज्यात लियान प्लंकेट सर्वात महागडा खेळाडू ठरला. गुजरातने त्याच्यावर ४१.५६ लाखांची बोली लावली. या स्पर्धेत शिखर धवन गुजरातकडून खेळणार आहे. मात्र त्याला किती लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलंय, याबाबत गुजरातने कुठलाही खुलासा केलेला नाही.

लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या खेळाडूंसाठी आहे. ही स्पर्धा यावेळी काश्मीरमध्ये होणार आहे. या हंगामात नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलेले शिखर धवन आणि दिनेश कार्तिक देखील खेळताना दिसून येणार आहेत. शिखर धवनने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. त्यानंतर त्याने आयपीएल स्पर्धाही खेळणार नसल्याचं सांगितलं होतं. तर दिनेश कार्तिकने आयपीएलनंतर क्रिकेटला रामराम ठोकला होता.

या स्पर्धेत एकूण २५ सामने खेळले जाणार आहेत. तर स्पर्धतील फायनलचा सामना १६ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com