World Cup 2023: लिम्का स्पोर्ट्सची वनडे वर्ल्डकपमध्ये एन्ट्री! क्रीडाप्रेमींना दिलंय खास चॅलेंज

Limca Sportz World Cup Challenge: येत्या काही दिवसात वनडे वर्ल्डकप स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
Limca Sports World Cup Challenge
Limca Sports World Cup Challengesaam tv

Limca Sportz World Cup Challenge:

कोला-कोला इंडियाचा एतद्देशीय ब्रॅण्ड लिम्काचे लिम्कास्पोर्टझ हे हायड्रेशन पेय, आयसीसी पुरुषांच्या क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ साठीचे अधिकृत स्पोर्टस् ड्रिंक झाले आहे. क्रीडापटू आणि क्रियाशील व्यक्तींना पाठिंबा देण्याप्रती या ब्रॅण्डची बांधिलकी यातून स्पष्ट झाली आहे.

शास्त्रशुद्ध मिश्रणातून तयार करण्यात आलेल्या लिम्कास्पोर्टझ इयॉन फोर या कमी कॅलरीयुक्त स्पोर्टस् पेयात ग्लुकोज, इलेक्ट्रोलाइट्स (सोडियम, पोटॅशिअम, कॅल्शिअम व मॅग्नेशिअम) आणि ब-जीवनसत्त्वाची शक्ती एकत्र आली आहे.

त्यामुळे शारीरिक श्रमाच्या उपक्रमांदरम्यान कमी होत असलेले शरीरातील पाणी जलद गतीने भरून निघते (रिहायड्रेशन) आणि ऊर्जा टिकून राहते. तज्ज्ञांनी तयार केलेले लिम्कास्पोर्टझ इयॉन फोर हे सर्वार्थाने व्यावसायिक स्पोर्टस् हायड्रेशन आहे.

Limca Sports World Cup Challenge
Asia Cup 2023: आशिया चषकाच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास कोण होईल विजेता?

रिहायड्रेशन, रिएनर्जायझिंग (ताजेतवाने करणे) आणि रिप्लेनिशिंग (ऊर्जा भरून काढणे) या क्रीडा कामगिरीतील तीन निर्णायक बाबींसाठी हे पेय उत्तम आहे. याची चव समाधान देणारी आहेच, शिवाय #RukMat (थांबू नका) हा प्रभावी संदेश हे पेय देते. ब्रॅण्ड आणि क्रिकेटपटू या दोहोंमधील चिकाटी व जिवंतपणाचे चैतन्य यात सामावलेले आहे.

क्रिकेटप्रेमींमधील उत्साह जागृत करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असलेला हा ब्रॅण्ड यो-यो टेस्ट चॅलेंज ही अफलातून परीक्षा ग्राहकांसाठी घेणार आहे. त्यांच्या तंदुरुस्तीची कुवत बघण्यासाठी तसेच लिम्कास्पोर्टझच्या प्रगत हायड्रेशन पुरवण्याच्या क्षमतेवर हे चॅलेंज आखण्यात आले आहे.

यो-यो चाचणी हे व्यक्तीच्या एरोबिक तंदुरुस्ती व सहनशक्ती यांचे सर्वसमावेशक मापक आहे तसेच सर्वोत्तम कामगिरी करण्याचे उद्दिष्ट बाळगणाऱ्या क्रीडापटूंसाठी हा महत्त्वाचा घटक आहे. क्रीडाप्रेमींच्या अविचल उत्साहाचा लाभ घेत, लिम्कास्पोर्टझ डिजिटलच्या पहिल्या यो-यो चाचणीमध्ये भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करणारा ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता क्रीडापटू नीरज चोप्राचा समावेश असेल.

नीरज चोप्रा सोशल मीडियावर या अभियानाचा शुभारंभ करेल. ‘यो-यो टेस्ट लेके देखो, वर्ल्डकप जाने का मौका पाओ’ या अलीकडील अॅक्टिवेशनमध्ये ग्राहक लिम्कास्पोर्टझ बाटलीवरील क्यूआर कोड स्कॅन करून आव्हान (चॅलेंज) स्वीकारू शकतात आणि वर्ल्डकपमधील सामन्यांची तिकिटे प्राप्त करण्याची संधी मिळवू शकतात. त्यामुळे त्यांची उत्कंठा व रोमांच अधिक वाढणार आहे.

Limca Sports World Cup Challenge
India vs Pakistan Match: भारत- पाकिस्तान सामन्याबाबत मोठी अपडेट! पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय होणार?

क्रिकेट हा संपूर्ण राष्ट्रासाठी जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे लिम्कास्पोर्टझने देशभरातील ६०हून अधिक कॉलेजांशी सहयोग केला आहे. या सहयोगाद्वारे देशातील तरुणांना त्यांच्या आतील तंदुरुस्तीचे प्रेम बाहेर आणण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. लिम्कास्पोर्टझ टेस्ट चॅलेंज घेणाऱ्या सर्व कॉलेजांना एका बहुआयामी डॅशबोर्डद्वारे एकत्र आणले जाणार आहे.

विजेत्या संघांना वर्ल्डकप स्पर्धेतील एक सामना बघण्यासाठी एक्सक्लुजिव तिकिटे दिली जातील. या तंदुरुस्ती चाचण्यांदरम्यान रिहायड्रेशनची सुविधाही लिम्कास्पोर्टझद्वारे दिली जाणार आहे.

कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट आशियाच्या हायड्रेशन, कॉफी व टी कॅटेगरीच्या मार्केटिंग विभागाचे संचालक कार्तिक सुब्रमणियन या सहयोगाबद्दल म्हणाले, "आयसीसी पुरुषांच्या क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ या स्पर्धेसाठी अधिकृत स्पोर्टस् ड्रिंक म्हणून निवड झाल्याचा लिम्कास्पोर्टझला अभिमान वाटतो.

जगभरातील क्रीडापटूंना आमच्या रिहायड्रेशन पेयाच्या माध्यमातून पाठिंबा देणे आमच्यासाठी थरारक अनुभव असेल. आमचे हे पेय चवीलाही उत्तम आहे आणि त्याचे कार्यात्मक लाभही अनेक आहेत.

बहुआयामी यो-यो टेस्ट चॅलेंजमध्ये, वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप्समधील भारताचा पहिलावहिला सुवर्णपदक विजेता व अविश्वसनीय क्रीडापटू नीरज चोप्रा असेल. आपले कणखर चैतन्य आणि अविचल समर्पण यांसाठी जगभरात ओळखला जाणारा नीरज चोप्रा तंदुरुस्तीच्या आव्हानासाठी आदर्श आहे." (Latest sports updates)

Limca Sports World Cup Challenge
AFG VS SL, Asia Cup: गणित चुकलं ना राव! ३७.१ षटकानंतरही अफगाणिस्तानला होता चान्स; काय होतं समीकरण? जाणून घ्या

विख्यात क्रीडापटू तसेच ऑलिम्पिक व वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप्समधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने लिम्कास्पोर्टझ यो-यो चॅलेंजबद्दल उत्साहाची भावना व्यक्त केली. तो म्हणाला, "लिम्कास्पोर्टझ सोबत सहयोग करणे माझ्यासाठी थरारक अनुभव आहे. लिम्कास्पोर्टझ क्रीडापटूंना हायड्रेशनसाठी मदत करते.

कामगिरी कमाल स्तरावर नेण्यासाठी तसेच दुखापती टाळण्यासाठी हायड्रेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. हे आव्हान कार्यक्षम कामगिरीला बढावा देते तसेच प्रत्येक सहभागी सदस्याला त्याच्या/तिच्या सीमा सातत्याने विस्तारत राहण्यास प्रेरणा देते.”

‘यो-यो टेस्ट चॅलेंज’ची संकल्पना डब्ल्यूपीपी ओपन एक्सची आहे. या अभियानामागील सर्जनशील विचार स्पष्ट करताना कंपनीचे क्रिएटिव लीड वरु अंचान म्हणाले, "यो-यो टेस्ट ही क्रिकेटसाठी अंतिम तंदुरुस्ती चाचणी आहे. क्रिकेटपटूंसह सर्व क्रीडापटू तंदुरुस्तीचा मानक म्हणून या चाचणीची काटेकोरपणे पूर्तता करतात.

लिम्कास्पोर्टझ हे एक प्रगत हायड्रेशन उत्पादन आहे. ते क्रीडापटूंना त्यांची सर्वोत्तम कामगिरी करण्यामध्ये सहाय्य पुरवते. या उत्पादनाच्या कार्यात्मकतेतूनच ही कल्पना पुढे आली. उत्पादनाची कार्यात्मकता चाचणीच्या स्वरूपातील आव्हानाशी जोडण्यात आली.

ऑलिम्पिक पदक विजेता क्रीडापटू नीरज चोप्रा या अभियानाचे नेतृत्व करत असून, आम्ही आगामी आयसीसी पुरुषांच्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी क्रिकेटपटू व चाहते दोघांना तयार करण्याच्या दृष्टीने अनेक क्रीडा व तंदुरुस्ती समर्थकांशी सहयोग करत आहोत.”

लिम्कास्पोर्टझमधून होणारे हायड्रेशन कामगिरीदरम्यान सहनशक्तीचा समतोल साधण्यात मदत करते. स्वत:च्या सीमा ओलांडण्याचा तसेच अधिकाधिक उंचीवर पोहोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे पेय फारच उपयुक्त आहे.

हे अभियान उत्पादनाच्या पॅकभवती फिरणारे असून, त्याला मल्टिमीडिया संवादाची जोड देण्यात आली आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील अनुभव व प्रत्यक्ष अॅक्टिव्हेशन्स असे याचे स्वरूप आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com