IPL 2024 KKR vs PBKS:
IPL 2024 KKR vs PBKS: X IPL

IPL 2024 KKR vs PBKS: केकेआरकडून धावांचा वर्षाव; पंजाबसमोर २६२ धावांचे आव्हान

IPl 2024 : आयपीएलचा ४२ व्या सामना कोलकाता नाईट रायडर्स पंजाब किंग्समध्ये होत आहे. हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डनच्या स्टेडियमवर खेळला जात आहे.

Kolkata Knight Riders vs Punjab Kings : आयपीएलचा ४२ व्या सामना कोलकाता नाईट रायडर्स पंजाब किंग्समध्ये होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डनच्या स्टेडियमवर खेळला जात आहे. घरच्या मैदानात सामना खेळणाऱ्या केकेआर संघाने पंजाब संघाच्या गोलंदाजांची जबर धुलाई केली. कोलकाता संघाने १३.११ च्या रन रेटने निर्धारित २० षटकात २६१ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी पंजाबला २६२ धावा कराव्या लागतील. या सामन्यात पंजाबचा पराभव झाला तर आयपीएलच्या स्पर्धेतून बाहेर पडेल.

प्रथम फलंदाजी करताना केकेआरच्या सुनील नारायण आणि साल्टने पंजाबच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. फिलिप साल्टने ३७ चेंडूचा सामना करताना ६ चौकार ६ षटकार मारलेत. याच्या मदतीने साल्टने ७५ धावांची खेळी केली. सुनील नारायणनेही पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सुनीलने ३२ चेंडूचा सामना करत ७१ धावांची खेळी केली. यात त्याने ९ षटकार आणि ४ षटकार मारलेत. या दोघांच्या फटेकबाजीच्या जोरावर केकेआरने पंजाबसमोर २६१ धावांचा डोंगर उभारला. केकेआरच्या फलंदाजांनी आपल्या डावात १८ षटकार मारलेत.

पंजाबचा कर्णधार सॅम करन सर्वात महागडा गोलंदाज ठरला. केकेआरच्या फलंदाजांनी सॅमने ४ षटक टाकलेत आणि एक विकेट घेतली परंतु केकेआरच्या फलंदाजांनी ६० धावा कुटल्या. आपल्या यॉकरने फलंदाजांची भंबेरी उडवणारा कसिगो रबाडादेखील पंजाबच्या संघासाठी महागडा गोलंदाज ठरला. रबाडाने ४ षटकांत ५२ धावा दिल्या,रबाडाला आपल्या स्पेलमध्ये एकही विकेट घेता आली नाही. त्यानंतर हर्षल पटेलने ४८ धावा दिल्या. पटेललाही एकच विकेट मिळाली.

कोलकाता संघ पॉईंट्स टेबलवर दुसऱ्या स्थानावर आहे. कोलकाता ७ पैकी ५ सामने जिंकलेत. दोन सामन्यांत केकेआरला पराभवाचा सामना करावा लागलाय. कोलकाताच्या खात्यात १० गुण आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्स ८ सामन्यांत केवळ ४ गुण आहेत. संघाला ६ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलाय. फक्त दोन विजय मिळालेत. आता प्रत्येक सामना पंजाबसाठी बाद फेरीसारखा म्हणजेच नॉकऑउट सारखा आहे. एकही सामना गमावल्यानंतर पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो.

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

कोलकाता नाईट रायडर्स : फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

पंजाब किंग्ज : जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन (कर्णधार), रिले रुसो, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

IPL 2024 KKR vs PBKS:
Virat Kohli: स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीवर महान क्रिकेटपटूचा 'स्ट्राइक'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com