KKR Team Fined: CSK ला पराभूत करणाऱ्या KKR वर BCCI ची मोठी कारवाई; कर्णधारासह अख्खी प्लेईंग ११ सापडली गोत्यात

Nitish Rana And KKR Team Fined: हा सामना जिंकूनही कोलकाता नाईट रायडर्स संघाला बीसीसीआयने मोठा धक्का दिला आहे.
csk vs rcb
csk vs rcb saam tv
Published On

CSK VS KKR, IPL 2023: चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता.

या महत्वाच्या सामन्यात रिंकू सिंग आणि नीतीश राणाच्या आक्रमक खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने जोरदार विजय मिळवला.

तर पराभूत झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची प्लेऑफमध्ये जाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान हा सामना जिंकूनही कोलकाता नाईट रायडर्स संघाला बीसीसीआयने मोठा धक्का दिला आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या.

csk vs rcb
IPL 2023 Points Table: KKR विरुध्दच्या पराभवानंतर CSK बाहेर? तर या २ संघांची झाली चांदी; पाहा काय आहे प्लेऑफचं समीकरण

बीसीसीआयची मोठी कारवाई..

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने जोरदार विजय मिळवला. मात्र विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार नीतीश राणा आणि संघातील खेळाडूंवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार नीतीश राणावर २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर प्लेइंग ११ मध्ये असलेल्या प्रत्येक खेळाडूला मॅच फीच्या २५ टक्के किंवा ६ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

ही कारवाई स्लो ओव्हर रेटमुळे करण्यात आली आहे.चेन्नई सुपर किंग्ज संघाची फलंदाजी सुरु असताना कोलकाता नाईट रायडर्स संघातील गोलंदाजांनी निर्धारित वेळेत षटके पूर्ण केली नव्हती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. (Latest sports updates)

चेन्नईचा दारुण पराभव..

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय चुकीचा ठरताना दिसून आला. कारण चेन्नईच्या फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही.

सलामीवीर फलंदाज डेवोन कॉनव्हे ३० तर ऋतुराज गायकवाड अवघ्या १७ धावा करत माघारी परतला. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून शिवम दुबेने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ गडी बाद १४४ धावा केल्या होत्या.

csk vs rcb
IPL 2023 Points Table: RCB कडून दारुण पराभव झालेला राजस्थानचा संघ अजूनही करू शकतो प्लेऑफमध्ये प्रवेश! फक्त करावं लागेल हे काम

या धावांचा पाठलाग करताना, कोलकाता नाईट रायडर्स संघातील सलामीवीर फलंदाजांना देखील हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. सलामीवीर फलंदाज जेसन रॉय १२ तर रहमानुल्लाह गुरबाज १ धाव करत माघारी परतला.

शेवटी कर्णधार नीतीश राणा आणि रिंकू सिंगचे चेन्नईच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या डावात नीतीश राणाने सर्वाधिक ५७ धावा केल्या. तर रिंकू सिंगने ५४ धावांची खेळी करत कोलकाता नाईट रायडर्स संघाला ६ गडी राखुन विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com