

Team India: भारतीय संघातील ३ प्रमुख खेळाडू सध्या एनसीएमध्ये आपली फिटनेस मिळवण्यासाठी कसून मेहनत घेताना दिसून येत आहेत. ज्यात केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुलचा समावेश आहे.
आयपीएल २०२३ स्पर्धेदरम्यान केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता त्याच्या फिटनेसबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
आयपीएल २०२३ स्पर्धा सुरु असताना ज्यावेळी केएल राहुल क्षेत्ररक्षण करत होता, त्यावेळी त्याच्या मांडीचे स्नायु खेचावले गेले होते. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. आता तो NCA मध्ये पुनर्वसनची प्रक्रिया पुर्ण करत असुन त्याचे काही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागले आहेत.
आता लवकरच तो फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. रिषभ पंत संघाबाहेर असल्यामुळे भारतीय संघात अनुभवी यष्टीरक्षक फलंदाजाची कमतरता जाणवतेय. केएल राहुल ही जागा भरून काढू शकतो. येत्या काही दिवसात भारतीय संघ आयर्लंड संघाविरूद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेत केएल राहूल कमबॅक करताना दिसून येऊ शकतो. (Latest sports updates)
जसप्रीत बुमराहचं होणार कमबॅक..
भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सप्टेंबर २०२२ पासून संघाबाहेर आहे. तो पाठीच्या दुखण्यामुळे तो संघाबाहेर झाला होता. त्याच्या पाठीच्या दुखण्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून त्याने मैदानावर उतरून गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे.
तो सध्या NCA मध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसून येत आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, तो आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारतीय संघाकडून कमबॅक करू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.