KKR Vs RCB : आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार? टॉस जिंकून आरसीबीचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

IPL 2023 : फाफ डुप्लेसिसच्या संघाने पहिला सामना जिंकला आहे तर केकेआरला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.
IPL 2023 KKR Vs RCB
IPL 2023 KKR Vs RCBIndianPremierLeague@twitter
Published On

IPL 2023, KKR Vs RCB : कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (KKR Vs RCB) यांच्यात आज रोमांचक लढत होत आहे. या सामन्या टॉस जिंकून आरसीबीने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. फाफ डुप्लेसिसच्या संघाने पहिला सामना जिंकला आहे तर केकेआरला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

सामन्यापूर्वी सांघिक संयोजनाबाबत बोलायचे झाले तर केकेआरसमोर अनेक आव्हाने आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीनंतर आता शाकिब अल हसनही संघासाठी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत त्याला प्लेइंग 11 ची निवड करणे खूप कठीण जाऊ शकते. दुसरीकडे, आरसीबी उत्कृष्ट लयीत आहे.

IPL 2023 KKR Vs RCB
Virat Kohli Records: KKR विरुद्ध होणाऱ्या सामन्यात विराटची बॅट तळपली तर 'हे' मोठे रेकॉर्ड्स 100 टक्के तुटणार

ईडन गार्डन्सवर पडणार विक्रमांचा पाऊस

- आज ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सचा विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सामना होईल.

- या सामन्यात अनेक खेळाडू मोठ मोठे विक्रम करून नवा इतिहास लिहिणार आहेत.

- कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नरेन आयपीएलमधला 150वा सामना खेळणार आहे.

- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हर्षल पटेल आयपीएलमध्ये 100 विकेट्सपासून फक्त 2 विकेट दूर आहे.

- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिनेश कार्तिक टी-20 क्रिकेटमध्ये 7000 धावा पूर्ण करण्यापासून 59 धावा दूर आहे.

- कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल आपला 100 वा सामना खेळणार आहे.

- आंद्रे रसेल टी-20 क्रिकेटमध्ये 500 विकेट्सपासून 6 चौकार आणि 400 विकेट्सपासून 10 विकेट्स दूर आहे.

- कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा आयपीएलमध्ये 200 चौकारांपासून 7 चौकार दूर आहे.

- कोलकाता नाईट रायडर्सचा टीम साऊथी आयपीएलमध्ये 50 विकेट्सपासून 3 विकेट दूर आहे.

- कोलकाता नाईट रायडर्सचा रहमानउल्ला गुरबाज टी-20 क्रिकेटमध्ये 200 षटकारांपासून 2 दूर आहे. (Sports News)

IPL 2023 KKR Vs RCB
IPL 2023 Orange Cap List: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत भारतीय फलंदाजांचा दबदबा; ऋतुराज अव्वल स्थानी तर हे आहेत टॉप 5 फलंदाज

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): मनदीप सिंग, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, सुयश शर्मा, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com