न्यूझीलंडच्या फलंदाजाचं तामिळ स्टाईल प्री-वेडिंग; चेन्नईचा संपुर्ण संघ हजर

डेव्हॉन कॉनवे प्रथमच आयपीएलचा भाग बनला आहे. त्याला एक कोटी रुपयात विकत घेतले आले.
 Devon Conway- Pre Wedding
Devon Conway- Pre Wedding Saam TV
Published On: 

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये चेन्नई सुपर किंग्जची (CSK) अवस्था अतिशय बिकट आहे. या संघाने सहा पैकी पाच सामने गमावले असून गुणतालिकेतील खराब संघांमध्ये त्यांचा समावेश आहे. पण मैदानी निकालाव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्जच्या संघात बरीच धमाल पाहायला मिळत आहे. 19 एप्रिल रोजी, डेव्हॉन कॉनवेच्या (Devon Conway) प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ CSK च्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळाले. 18 एप्रिल रोजी न्यूझीलंडच्या फलंदाजासाठी हॉटेलमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचे सर्व खेळाडू उपस्थित होते. सर्वजण तामिळनाडूच्या पारंपरिक वेशभूषेत दिसले. तसेच डेव्हॉन कॉनवेसोबत सगळ्यांनी खूप मजा केली.

डेव्हॉन कॉनवे प्रथमच आयपीएलचा भाग बनला आहे. त्याला एक कोटी रुपयात विकत घेतले आले. या मोसमातील पहिल्याच सामन्यात त्याने CSK च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले होते. .यंदाच्या हंगामात संघासाठी केवळ तो एक सामना खेळला आहे. 18 एप्रिलला डेव्हॉन कॉनवेच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सर्वच खेळाडूंनी खूप मजा केली. CSK च्या खेळाडूंपासून ते सपोर्ट स्टाफपर्यंत सर्वांनी कुर्ता आणि वस्ती (एक प्रकारचे धोतर) परिधान केले होते. CSK ने 90 च्या दशकात प्रमाणे बनवलेल्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

कोण आहे कॉनवेची लाईफ पार्टनर

डेव्हन कॉनवेचे 2020 मध्ये किम वॉटसनशी लग्न ठरले होते. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत CSK तर्फे विवाहपूर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किम वॉटसन अजूनही भारतातच आहे. व्हिडिओ कॉलद्वारे ती या कार्यक्रमात सामील झाली होती. CSK ने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये किम पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. त्याच वेळी, कॉनवेने पांढरा शर्ट आणि बनियान घातला होता. या कार्यक्रमासाठी त्यांनी सीएसकेचे आभार मानले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.