

T-20 Blast 2023: इंग्लंडमध्ये सध्या टी -२० ब्लास्ट स्पर्धेचा थरार सुरु आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर या स्पर्धेत तो लंकाशायर संघाचे प्रतिनिधित्व करतोय. रविवारी या स्पर्धेत लंकाशायर आणि नॉर्थहॅम्पटन हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात लंकाशायर संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.
या सामन्यात जोस बटलरला फलंदाजीमध्ये हवी तशी कामगिरी करता आली नाही. मात्र यष्टीच्या मागे त्याने भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Jos Buttler Catch Video)
जोस बटलरचा अविश्वसनीय झेल..
या सामन्यात नॉर्थहॅम्पटन संघाची फलंदाजी सुरु असताना जोस बटलर यष्टिरक्षण करत होता. यादरम्यान रिकार्डो वास्कोनसेलेसला बाद करण्यासाठी जोस बटलरने एक अविश्वसनिय झेल टिपला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
तर झाले असे की, नॉर्थहॅम्पटन संघाची फलंदाजी सुरू असताना लंकाशायर संघाकडून तिसरे षटक टाकण्यासाठी ल्युक वुड गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी रिकार्डो वास्कोनसेलेस हा फलंदाजी करत होता.
ल्युक वुडचा चेंडू बॅटची कडा घेत थेट यष्टीरक्षण करत असलेल्या जोस बटलरच्या हातात गेला. हा चेंडू त्याच्यापासून दूर होता. मात्र त्याने डाव्या बाजूला डाइव्ह मारली आणि भन्नाट झेल टिपला. (Latest sports updates)
बटलरला अॅशेस मालिकेत घ्या..
जोस बटलरचा हा भन्नाट झेल पाहून चाहत्यांनी त्याला अॅशेस मालिकेत खेळवण्याची मागणी केली आहे. या मालिकेत इंग्लंड संघाकडून जॉनी बेअरस्टो यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका पार पाडतोय. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये २ सामने खेळवले गेले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये जॉनी बेअरस्टो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ही मागणी जोर धरू लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.