Asia Cup 2023: हार्दिक पंड्याची होणार सुट्टी! आशिया चषकासाठी जसप्रीत बुमराहला मिळणार मोठी जबाबदारी

Team India Vice Captain: आशिया चषकासाठी जसप्रीत बुमराहला मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.
jasprit bumrah
jasprit bumrah saam tv
Published On: 

Asia Cup 2023 Jasprit Bumrah:

येत्या काही दिवसात आशिया चषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. नुकताच वेस्टइंडीजविरूद्ध झालेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला २-३ ने पराभवाचा सामना करावा लागला होता.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली होती. दरम्यान असा अंदाज व्यक्त केला जात आहे की,हार्दिक पंड्याला उपकर्णधार पदावरून काढून ही जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवली जाऊ शकते.

वेस्टइंडीजविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्याने घेतलेल्या निर्णयांवरून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. नेतृत्वासह त्याला फलंदाजी आणि गोलंदाजीतही हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. यासह पराभव झाल्यानंतर त्याने काही वादग्रस्त वक्तव्य देखील केली होती.

जसप्रीत बुमराहचं दमदार कमबॅक..

गेले ११ महिने दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमराह आयर्लंडविरूद्धच्या टी-२० मालिकेत कमबॅक करताना दिसून आला आहे. कमबॅक करताच त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ज्यावेळी रोहित शर्माला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यावेळी निवडकर्त्यांनी स्पष्ट केलं होतं की, जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि रिषभ पंत हे लिडरशिप ग्रुपमध्ये प्रमुख खेळाडू असतील. गेल्या वर्षी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. (Latest sports updates)

जसप्रीत बुमराह आयर्लंड दौऱ्यावरही उल्लेखनीय कामगिरी करताना दिसून येत आहे. भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. युवा खेळाडू आणि जसप्रीत बुमराह याच्यांत उत्तम ताळमेळ असल्याचे दिसून आले आहे. त्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. योग्य गोलंदाजाला गोलंदाजी दिली. तसेच स्वत: देखील संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहला ही जबाबदारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com