RCB vs CSK: हाय व्होल्टेज सामन्यावर पावसाचं सावट; RCB च्या अपेक्षांवर पाणी फेरणार?

RCB vs CSK PlayOff : आयपीएलमधील ६८ वा सामना शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये होणार आहे. या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु या सामन्यासंदर्भात वाईट बातमी हाती आलीय.
RCB vs CSK: हाय व्होल्टेज सामन्यावर पावसाचं सावट; RCB च्या अपेक्षांवर पाणी फेरणार?
RCB vs CSK PlayOff

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामना नॉकआउट सामना मानला जातोय. यामुळे हा सामना रोमहर्षक होण्याची अपेक्षा आहे, मात्र या रंजक सामन्यावर पावसाचं सावट आहे.

सीएसके आणि बेंगळुरूच्या संघात १८ मे रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यादरम्यान पाऊस झाला तर आरसीबीच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा धुळीस मिळतील. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने पाईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादनेही प्लेऑफ फेरीमध्ये प्रवेश केलाय. फेरीमध्ये चौथ्या संघ कोणता असेल हे आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामन्यातून कळणार आहे. परंतु या सामन्यावर पावसाचं सावट असल्याने आरसीबी चाहत्यांच्या मनात धाकधूक वाढलीय.

Accuweather.com वेबसाइटनुसार, शनिवारी संध्याकाळी बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण वर्षभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून ७.२ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल, त्याचवेळी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

प्‍लेऑफमध्ये आरसीबी कशी पोहोचणार

आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर त्यांनी प्रथम फलंदाजी केल्यास सीएसकेला १८ धावांच्या फरकाने पराभूत करावे लागेल. जर आरसीबी १७ किंवा त्यापेक्षा कमी धावांच्या फरकाने जिंकला तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जातील. कारण आरसीबीचा रनरेट कमी आहे. जर सीएसकेविरुद्ध सामना खेळताना आरसीबीने जर लक्ष्याचा पाठलाग केला तर त्यांना १८.१ षटकापूर्वीच आव्हान गाठवावे लागेल.

RCB vs CSK: हाय व्होल्टेज सामन्यावर पावसाचं सावट; RCB च्या अपेक्षांवर पाणी फेरणार?
MI vs LSG, Weather Update: मुंबई- लखनऊ सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा होणार?

प्लेऑफमध्ये सीएसके कशी पोहोचणार

चेन्नई सुपरकिंग्जला प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना आरसीबीला पराभूत करावं लागेल. जर सीएसकेला आरसीबीने १८ किंवा त्यापेक्षा कमी धावांनी पराभव केला तरी चेन्नईचा संघ पात्र होईल. तर जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. तरीही चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफसाठी पात्र ठरेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com