RR VS SRH : राजस्थानने जिंकला टॉस! रियान पराग कॅप्टन, तर संजू सॅमसन इम्पॅक्ट प्लेयर; पाहा प्लेईंग 11

IPL 2025 : आयपीएलचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. या सामन्यामध्ये टॉस जिंकत राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा दोन्ही संघांची प्लेईंग ११
IPL 2025 RR VS SRH
IPL 2025 RR VS SRHX (Twitter)
Published On

IPL 2025 : आयपीएलला काल सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात बंगळुरूच्या संघाने कोलकातावर विजय मिळवला. आज (२३ मार्च) रोजी आयपीएल २०२५ मधील पहिले डबल हेडर सामने खेळले जाणार आहेत. आज पहिला सामना हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात हैदराबाद येथे, तर दुसरा सामना मुंबई आणि चेन्नई यांच्यात चेन्नई येथे होईल.

संजू सॅमसनला दुखापत झाल्याने त्याच्या जागी रियान परागकडे राजस्थानच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रियानने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान आणि हैदराबाद दोन्ही संघाची प्लेईंग ११ ची माहिती समोर आली आहे. राजस्थानने संजू सॅमसनला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून निवड केली आहे.

IPL 2025 RR VS SRH
IPL 2025 : हैदराबाद आणि चेन्नईमध्ये कशी असेल खेळपट्टी? कोणत्या संघाला मिळणार फायदा? Pitch Report जाणून घ्या..

सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग ११ -

पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, सिमरजीत सिंह

IPL 2025 RR VS SRH
KKR VS RCB : बॅट स्टंपला लागली, बेल्स खाली पडल्या..., पण सुनील नरेन का आउट झाला नाही?

राजस्थान रॉयल्स प्लेईंग ११ -

रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, नितीश राणा, शिमरन हेटमायर, शुभम दुबे, ध्रुव जरेल, फजहलहक फारुकी, जोफ्रा आर्चर, महिश तीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा

IPL 2025 RR VS SRH
Virat Shahrukh Dance Video : 'झूमे जो पठाण..' मॅचपूर्वी शाहरुख खानसोबत विराट कोहलीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com