Pat Cummins: आयपीएलच्या मध्यात हैदराबादला धक्का! पॅट कमिन्सच्या बायकोची Instagramस्टोरीनं चर्चांना उधाण

Pat Cummins Wife Insta Post: पॅट कमिन्स आयपीएल २०२५ च्या मध्येच सोडून मायदेशी परतणार आहे? हा प्रश्न करण्यामागे त्याची पत्नी बेकी कमिन्सने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केलीय.
Pat Cummins Wife Insta Post
Pat Cummins Wife Insta Post:
Published On

आयपीएल २०२५ ऐन रंगात आले आहे, स्पर्धेत भाग घेतलेल्या संघांमध्ये प्लऑफसाठी चढाओढ लागलीय. पण त्याच दरम्यान हैदराबाद कर्णधाराच्या पत्नीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलीय. त्या पोस्टमुळे चौकाचौकात चर्चा सुरू झाल्या आहेत. आयपीएलच्या मध्यात सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स टुर्नामेंट अर्ध्यावरच सोडून माघारी जाणार असल्याची चर्चा सुरू झालीय.

पण हैदराबाद किंवा कमिन्सकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेली नाहीये, पण पॅटची पत्नी बेकी कमिन्सच्या इंस्टाग्राम पोस्टवरून चर्चा सुरू झाल्या आहेत. ही पोस्ट बेकी आणि पॅट याची आहे. कमिन्स ब्रेक घेणार असल्याचं म्हटलं जात आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम तयार झालाय.

काय आहे इंस्टाग्राम पोस्ट

पॅट कमिन्सची पत्नी बेकीने इंस्टाग्रामवर दोन स्टोरी शेअर केल्या आहेत. पहिल्या स्टोरीमध्ये बॅग्स दिसत आहेत. तो फोटो विमानतळाबाहेरील आहे. दुसरी स्टोरी बेकी कमिन्स तिचा पती पॅटसोबत दिसत आहे. यात तिने गुडबाय इंडिया!... या सुंदर देशात येऊ चांगलं वाटलं. या अशा पोस्टमुळे चाहते बुचकळ्यात पडलेत.

आयपीएल २०२५ मध्ये कमिन्सची कामगिरी

आयपीएल-२०२५ च्या ७ सामन्यांपैकी ६ डावात पॅट कमिन्सने ६४ धावा केल्या. त्याचा सर्वोच्च स्कोअर २२* धावा होता. यादरम्यान, हैदराबादचा कर्णधार कमिन्सने ७ विकेट्स घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट १०.२१ होता. एकूण आयपीएलमधील सामन्यांबाबत माहिती घेऊ. कमिन्सने ६५ सामन्यांमध्ये ७० विकेट्स घेतल्या, या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ८.८९ होता. कमिन्सने ६५ सामन्यांच्या ४७ डावात ५७९ धावा केल्या. त्याचा सर्वोच्च धावसंख्या ६६* होती.

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादची कामगिरी

पॅट कमिन्स हैदराबाद संघाचं नेतृत्व करत आहे. सनरायझर्स संघ सध्या पॉइंट्स टेबलच्या तळाशी आहे. हैदरबादने ७ सामने खेळले आहेत, यात त्यांनी २ सामने जिंकले आहेत. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. हैदराबादचा पुढचा सामना २३ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. कमिन्सच्या नेतृत्वाखाली, हैदराबाद संघ आयपीएल २०२४ मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com