
अहमदाबाद : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील Qualifier 2 सामन्याचा टॉस झाला आणि पावसाचं आगमन झालं. पंजाबचा संघ मैदानात उतरला आणि पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला. पण आता काही वेळापूर्वी पावसाने विश्रांती घेतली आहे. आता लवकरात लवकर सामना सुरु होत आहे. पण चालू सामन्यामध्ये पाऊस आला किंवा सामन्याआधी पाऊस आला आणि सामान रद्द झाला तर कोणता संघ फायनलमध्ये पोहोचू शकतो, हे आता समोर आलं आहे. याबाबत IPLचा नियम काय सांगतो?
मुंबई आणि पंजाब दोन्ही संघांसाठी आजचा सामना हा करो या मरो सामना आहे. कारण हा सामना क्वालिफायर २चा आहे. त्यामुळे या सामन्यात जो संघ जिंकेल, त्यांना फायनलमध्ये प्रवेश करता येऊ शकतो. पण जो संघ पराभूत होईल, त्यांचे आव्हान संपुष्टात येणार आहे. पण जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणता संघ फायनलमध्ये पोहोचणार, याचा नियम आता समोर आला आहे. बीसीसीआयने एक नवीन नियम या सामन्यासाठी बनवला आहे. या नियमानुसार आता दोन तास अतिरिक्त थांबलं जाऊ शकतं. पण या दोन तासातही जर सामना झाला नाही तर काय होणार? याचाही नियम बीसीसीआयने आता स्पष्टपणे सांगितला आहे.
जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर यापूर्वीच्या सामन्यांमध्ये नेमकं काय घडलं होतं? ते पाहिलं जाईल. यापूर्वी कोणत्या संघाने कशी कामगिरी केली, हे पाहणे महत्वाचं ठरतं. त्यासाठी पॉइंट्स टेबल पाहिलं जाईल. प्ले ऑफपूर्वी पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईचा संघ हा चौथ्या स्थानावर होता, तर पंजाब किंग्सचा संघ अव्वल स्थानावर विराजमान होता. त्यामुळे जर या सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर फायनलमध्ये पंजाब किंग्सला पाठवलं जाईल आणि मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे या सामन्याला पावसाचा फटका बसला तर तो मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी असू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.