GT vs PBKS Live Match : पंजाबच 'किंग्स'! रोमहर्षक सामन्यात गुजरातचा पराभव, पहिल्याच सामन्यात कॅप्टन अय्यर चमकला

IPL 2025 Live Match : गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये पंजाबचा ११ धावांनी विजय झाला आहे.
GT-vs-PBKS-Live-Match
GT-vs-PBKS-Live-Matchx
Published On

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल २०२५ मधला आणखी एक रोमांचक सामना खेळला गेला. शेवटच्या ओव्हरपर्यंत कोण जिंकतय हे स्पष्ट होत नव्हते. पण शेवटच्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंहने कमाल करत पंजाबचा विजय निश्चित केला. २४३ धावांचे लक्ष गाठताना गुजरातने २० ओव्हर्समध्ये २३२ धावा केल्या.

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबकडून खेळताना कर्णधार श्रेयस अय्यर पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला.

प्रियांश आर्याने ४७ धावा केल्या. प्रभसिमरन सिंग लवकर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यरने ४२ चेंडूंमध्ये वादळी ९७ धावा केल्या. त्याला शशांक सिंहची मदत मिळाली. शशांकने १६ चेंडंमध्ये ४४ धावा केल्या. २० ओव्हर्समध्ये पंजाब किंग्सने २४३ धावा केल्या. अय्यरचे शतक हुकले पण पंजाबने आयपीएलच्या इतिहासात पहिल्या इनिंग्समध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला.

GT-vs-PBKS-Live-Match
Shreyas Iyer : जे KKR नं गमावलं, ते पंजाबनं कमावलं; 5 चौकार, 9 षटकारांसह कॅप्टन अय्यरची वादळी खेळी

त्यानंतर शुबमन गिल आणि साई सुदर्शन फलंदाजी करण्यासाठी आले. पटापट ३३ धावा करत कर्णधार गिल माघारी परतला. साई सुदर्शनने ४१ चेंडूंमध्ये ७४ धावा केल्या. जॉस बटलर अर्धशतकीय खेळी करुन बाद झाला. तेवतियाने षटकार मारला पण तो शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर आउट झाला. गुजरातने २३२ धावा केल्या.

GT-vs-PBKS-Live-Match
IPL 2025 Live : श्रेयस 97 वर असताना शशांकने स्ट्राईक का दिली नाही? इनिंग संपल्यावर स्पष्टचं सांगितलं, शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडलं?

गुजरातची प्लेईंग ११ -

शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, आर साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

पंजाबची प्लेईंग ११ -

प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अझमतुल्ला उमरझाई, मार्को जानसेन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.

GT-vs-PBKS-Live-Match
GT Vs PBKS Live Match : ग्लेन मॅक्सवेल आउट नव्हताच... श्रेयस अय्यरची एक चूक आणि मैदान सोडावं लागलं, नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com